दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरला; आज देशात 64.24 तर राज्यात केवळ 53.51 टक्के मतदान

लोकसभा 2024 च्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या टप्प्यातही EVM मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना बऱ्याच केंद्रांवर पाहायला मिळाल्या त्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावं लागलं.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुस-या टप्प्यात देखील कमी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फोडा फोडिचे राजकारण आणि खरे रोजच्या जीवनातले मुद्दे बाजूला सोडून हिंदू मुस्लिम, वैयक्तिक टीका अशा निरर्थक विषयांना महत्त्व दिल जात असल्याने मतदारांनी मतदाना कडे पाठ फिरवल्याचा अंदाज आहे. देशातील 89 मतदारसंघात 64.24 टक्के मतदानाची नोंद झालीय. तर राज्यातील ८ मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झालंय. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर सर्वात कमी मतदान हिंगोलीत झालंय..
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आठ जागांवर मतदान पार पडतंय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात 53.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
वर्धा – 56.66
अकोला – 52.49
अमरावती – 54.50
बुलडाणा – 52.24
हिंगोली – 52.03
नांदेड – 52.47
परभणी – 53.79
यवतमाळ-वाशिम – 54.04
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत