वैचारीक वारीची सांगता ||mn sonawane pune
विसावा दिवस
नका धरू कोणी | राग वचनाचा मनी ||
येथे बहुतांचे हित | शुद्ध करोनि राखा चित्त ||
नाही केली निंदा | आम्ही दुसिलेंसे भेदा ||
तुका म्हणे मज | येणें विन काय काज ||
——संत तुकाराम महाराज
मी जे सांगतो हे,त्याचा कोणी मनामध्ये राग धरु नका. आपापले चित्त शुद्ध करून विचार केला तर यातूनच बहुजणांचे कल्याण होणार आहे. मी कोणाचीही निंदा केली नाही तर समाजात जो भेदभाव वाढला आहे, त्यातील दोष मी दाखविला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात हेच माझ्या जीवनाचे कार्य आहे
बहुजन मित्र हो !!
आज वैचारीक वारीचा शेवटचा दिवस …..
जन्मानेच काही माणसे श्रेष्ठ अथवा हीन असतात असे सांगणारी एक ब्राह्मणी वैदिक मनुवादि विचारधारा तर दुसरीकडे माणुस कोणत्या जातीत जन्माला आला, हे महत्वाचे नाही तर त्याची गुणवत्ता व शील महत्वाचे असे मानणारी मानवतावादी बहुजन विचारधारा
तेंव्हा तुम्हीच विचार करा…
कोणती विचारधारा आणि संस्कृतीप्रवाह आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल,
वैदिक विषमतावादी विचारधारा की बहुजन समतावादी विचारधारा यावर वैचारिक देवाणघेवाण व्हावे !
कोणत्या विचाराने भारतीय समाज जोडला जाईल,यावरही मंथन व्हावे !!
हाच “वैचारिक वारी – बौद्धिक दिंडी” तुमच्या पुढे घेऊन येण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता …..
खरेतर ब्राह्मण आणि ब्राह्मतणेतर हा मुद्दाच नाही, तर मुद्दा हा आहे की, मानवाच्या वैचारिक स्वातंत्र्य कोणाच्या स्पर्शाने, कोणाच्या शब्दाने, कोणाच्या उपस्थतीने कोण पवित्र होतो व कोण अपवित्र होऊ शकतो? हे अविचारी खुळ हा ब्राह्मण आणि बहुजनां मधिल वादाचा मुद्दा आहे
ब्राह्मणांसी विनाकारण वैचारिक संघर्ष करावा असा आमचा विचार नाही आणि उद्देश्य ही नाही.
पण……..
ब्राह्मण जेव्हा मानवी स्वातंत्र्याची गळचेपी करतो. सर्वसामान्याच्या जीवन शैलीवर अतिक्रमण करतो, मानुसकीला डाग लावनारे कृत्य करतो तेव्हा अशा व्यवस्थेला विरोध करने हे प्रत्येक स्वातंत्र्य बुद्धी असणार्याचे सामाजिक कर्तव्यच आहे.
ब्राह्मण नैतिक जाणिवांच्या व मुल्यांच्या बाबतीत स्वतःहुन काळाच्या पुढे कधीही गेलेले नाहीत, काय वाटेल ते झाले, तरी बहुजनांवरचे आपले धार्मिक वर्चस्व कमी होऊ द्यायचं नाही. बहुजन लोकांच्या मनावरची आपली पकड सुटू वा ढिली होऊ द्यायची नाही यावर ब्राह्मण काल जागृत होता, आज जागृत आहे आणि ते उद्या ही जागृतच राहतिल पण नैतिक क्षेत्रात काल आज आणि उद्या कोणीही ब्राह्मण तत्ववेत्ते व दार्शनिक तथागत बुद्धा सारख्याच्या पासंगालाही पुरण्याइतके गुणवान नाहीत
ख्रिश्र्चन, बौद्ध, इस्लाम हे धर्म आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पावले आहेत. जगभर या धर्माचा प्रसार आहे विस्तार आहे त्यांचे अनुयायी आहेत पण ब्राह्मणांनी हिंदू नावाचा धर्म भारतातच अवघडलेल्या अवस्थेत काल ठेवला होता आणि आजही त्याच अवघडलेल्या अवस्थेत ठेवला आहे
बहुजन समाजाने ब्राह्मण पंडिता पेक्षा सतांना आपले मानले, त्यांना डोक्यावर घेतले त्यांना हृदयात स्थान दिले याचे कारण ब्राह्मण पंडिताने अनेकदा ज्ञानाचा अहंकार बाळगून बहुजन ( sc/st/obc) यांना दुरच सारल. वैदिक ब्राम्हणानी बहुजना पासुन दुर राहण्याची खबरदारी घेतली या उलट संतानी बहुजनांनाआपल्या हृदयासी कवटाळलं, सतांनी आपले ज्ञान बहुजनांच्या धार्मिक गुलामीच्या मुक्तते ( sc st obc) साठी वापरले
परिस्थिति जर ब्राह्मण विरोधी आहे याची जानिव होताच तात्पुरती माघार घेऊन नंतर संधि मिळताच कपट कारस्थान, षडयंत्र विश्वासघाताने जबरदस्त प्रतिहल्ला करुन वैंदिक ब्राह्मणाने पूर्व प्रतिष्ढा पुन्हा प्राप्त केलेले इतिहासातिल दाखले आज ही आम्ही पाहू शकतो , अनुभवु शकतो
ब्राह्मण फार चालाख आहे कोणी ब्राह्मणांवर टिका केली तर ही ब्राह्मणांवर टिका नसुन ही टिका हिंदू वर आहे असे ब्राह्मण सांगतो. ब्राह्मणांचे अनैतिक चालीरीतीवर टिका केली तर ही टीका हिंदू संस्कृती वर आहे अशी मांडणी करून ब्राह्मण बहुजनांच्या डोळ्यांत धुळफेक करतो त्यामुळे हा डोळे असुन अंध झालेला बहुजन ब्राह्मणांवरची टिका हि स्वतःवरील टिका आहे असे मानुन आपल्याच बहुजनाच्या नरडिचा घोट घेण्यासाठी उताविळ असतो
अशा प्रकारे काट्यानेच काटा निघत असल्यामुळे ब्राह्मणांना आपल्या हातात शश्त्र घेण्याची गरज भासत नाही. ब्राह्मणांनाचे रक्षा कवच बहुजन असल्यामुळे ब्राह्मणांला पोटातील पाणी हलण्या इतकी ही हालचाल करावी लागत नाही
तुमचे आमचे पुर्वज हजारो वर्षे वैदिक ब्राम्हणांच्या मनुवादाच्या शोषणाला बळी पडले,
आमच्या पिढ्या बरबाद झाल्या आणि आज ही वैदिक ब्राह्मण मनुवादाच्या माध्यमातून बहुजनांचे धार्मिक शोषण तसेच मानसिक व बौद्धिक खच्चीकरण करतोच आहे…
गाडल्या आमच्या पिढ्या,
अन ठेवला नाही पुरावा |
स्मशानाच्या मालकीचा,
‘मनू’ चौकिदार होता ||
तथागत बुद्धा पासून ते संत तुकारामा पर्यत वेदनेचा, सहवेदनेचा तसेच सहकार्यशील संवेदनशील समातामुलक समाज निर्माण करण्याचा संघर्ष संपुर्ण भारतात चालू आहे. ह्या समतामुलक समाजाच्या जागृती आणि जाग्रणाच्या संघर्षात तुम्ही सर्व बहुजन आमंत्रित आहात, निमंत्रित आहात
कारण,
समता – स्वतंत्रता – बंधूता व न्याय ह्या समतामुलक विचारधारेच्या प्रेरणेच्या माध्यमातून समस्त बहुजनांच्या कल्याणासाठी त्यांच्या मंगल कामनेसाठी विषमतावादी वैदिक मनुवाद्या बरोबर संघर्ष करतांना आपले सर्वस्व बलिदान केले ते तमाम महापुरुष जर बहुजनांना आपले वाटत नसतिल तर,
वर्तमानात नव्हे तर भविष्यातही आम्हाला आमच्या बाजूने लढनारा असा कोणीही सापडणार नाही.
वैदिक मनुवाद्यांनी शब्दांच्या सामर्थ्यावर काळाच्या ओघात आमचे महापुरुष कधिच पळवून नेलेले आहेत. भुतकाळातिल ही प्रक्रिया आज ही वर्तमानात चालूच राहुदिली तर,
बुध्द – कबीर – रोहिदास – नानक – नामदेव – तुकाराम – शिवाजी – फुले – शाहु – आंबेडकर हे आमचेच महापुरुष वैदिक मनुवाद्यांच्या हातातिल शश्त्र बनून बहुजनांवरच वार करताना दिसतिल.
आमच्या कल्याणा करिता, आमच्यावरील अन्यायाच्या विरोधात मनुवाद्याबरोबर प्राणपणाने लढले तेच जर मनूवाद्याच्या हातातिल शश्त्र बनत असतिल तर “निर्मणुष्य” होन्याच्या दिसेने आपली वाटचाल असेल.
तेव्हा…..
🌹 मनीं माणूसकी जपूनी अत: करणी शुद्ध व्हावे |
प्रेम जगासी अर्पूणी बुद्धापरी बुद्ध व्हावे ||
तथागत बुद्धाच्यां आणि संतांच्या विचारधारेतुन बहुजनांचे (SC ST OBC) संस्कार आणि संस्कृतीचे समतामुलक नातं निर्माण व्हावे, अशा हेतुनेच मी ह्या वैचारिक वारीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझा ऐवढाच मर्यादित उद्देश या लेखना मागे होता.
कारण…
सत्य समजणे व ते समाजात प्रस्थापित करणे म्हणजेच शिक्षण असे महात्मा जोतीराव फुले म्हणतात. “जेव्हा अंधविश्वास तुमच्या शिक्षणावर हावी होतो, तर समजून घ्यावे की तुम्ही ‘मानसिक गुलाम’ झालेले आहात तेव्हा असत्यवादी दास किंवा गुलाम होण्या पेक्षा स्वतंत्र, सत्यवादी वास्तववादी होणे केंव्हा ही चांगल”
🪷 बुद्धाच्या या पावन भूमीत,
स्वप्न ही धम्माची रंगावी |
जगास कळावा विठ्ठलातल बुद्ध,
आणि
अवघी पंढरी पंचशीलाने पटावी ||
🙏🏻 धन्यवाद
••••••••••••••
संग्रहीत mn sonawane pune
••••••••••••••
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत