वारकरी संत चळवळ आणि बुद्ध
================ =======
उत्तर भारतात संतांनी विषमते विरुद्ध चळवळ केली तिला ‘भक्ती चळवळ’, तर महाराष्ट्रात या चळवळीस ‘वारकरी चळवळ’ म्हणतात. इ.स. बाराशेच्या दरम्यान या चळवळीचा पाया संत नामदेवांनी रचला. संत नामदेव हे महाराष्ट्रातील असले, तरी त्यांचा प्रभाव उत्तर भारतातील भक्ती चळवळ आणि शीख धर्मावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. वारकरी चळवळ म्हणजे हिंदू धर्मातील एक सुधारणावादी पंथ होय. आपण वारकरी चळवळीच्या अंगाने जेव्हा विचार करतो, तेव्हा वारकरी चळवळीतील संतांचे आणि सामान्य लोकांचे प्रेरणास्थान – दैवत म्हणजे पांडुरंग (विठ्ठल). हिंदू धर्मातील बहुतांश दैवत…
[12:41 PM, 7/18/2024] Dr. D.S.Sawant: आज बालवाडीपासून फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासून लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, विजेची १०० यूनिट्स मोफत, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जात आहेत.
ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते.
अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जात आहे.
यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या अनेक वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परीक्षा घेतली जात नाही.
९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे.
ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े भ्रमणध्वनी, गाड्या आणि तोंडात गुटखा अशी ही बहुतांश तरुणाई आपले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कसा चुकीचा या पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असतो.
फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होत आहे.
सगळे फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून सुध्दा त्यांची हीच अपेक्षा राहणार.
शिक्षण,आरोग्य या जीवनावश्यक गोष्टीं मोफत करा. फक्त अत्यंत प्रतिकूल गरीब कुटुंबाना मदत, सवलती द्या.
कोणतीही गोष्ट फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपांतर होते.
स्वित्झर्लंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलठ्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला होता
आपल्याला स्वित्झर्लंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.
आपल्याला जर खरच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगति पथावर न्यायचे असेल भारत मातेला परम वैभव प्राप्त करायचे असेल तर सगळे फुकट ही मानसिकता सोडा. अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय आज मनापासून करा. त्यापेक्षा सरकारने जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायला हव्यात.
अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे लाईट बिल तरी आपणच भरायला हवे, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्या पेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधलाच ना? ते जीवन जगलेच ना?
आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, इतर कोणत्याही देशात नाही.
मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो.
याच जिवंत उदाहरण आज खेडे गावामध्ये शेतात काम करायला मजुर मिळत नाही त्यामुळे शेती परवडत नाही याला जबाबदार आपले नेतेच ज्यानी ही अफुची गोळी आपल्या पीढीला दिली . सरकारतरी कोठुन आणि किती दिवस अस फुकट देणार कुठुन तरी खरेदी करणार त्याला पैसा कोण देणार आपणच आपल्याच करातुन आयकरातुन देणार
आणि मग यातून आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे ‘रिकामे मन, सैतानाचे घर’ यानुसार दुराचार , बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राची प्रगती होण्याऐवजी यातून नुकसानच जास्त होते.
“आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्की विचार करायला हवा.”
सध्याच्या अलिकडील काळातलचं पहा ना.
एकानेही मागणी न करता महिलांना व जेष्ठ नागरिकांना बस प्रवासातील सवलत असो, की “लाडकी बहिण योजना असो किंवा मध्ये मध्ये होणारी कर्जमाफी असो ही सर्व धोरणे, ऐतखाऊ व कर्ज बुडव्या पिढ्या निर्माण करणाऱ्या आहेत..
फुकट काहीच नको, यामुळे उज्वल भविष्याची स्वप्ने भंग होत आहेत तरुण पिढी निष्क्रिय बनत आहेत सरकार व समाज व्यवस्थेने या कडे लक्ष घातले पाहिजे. सुज्ञ सुजाण नागरिकांनी फुकट मुफ्त यागोष्टींना कडाडून विरोध करायला हवा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत