प्रत्येक बुध्द विहार हे ज्ञानाचे भंडार व्हावे – अक्षय आंबेडकर
मुंबई / प्रतिनिधी
बौध्द समाजाची प्रगती ही उत्तम शिक्षणावर अवलंबून आहे. या समाजातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्र काबीज केले पाहिजे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विद्यार्थीं उच्च शिक्षित झाले पाहिजे.प्रत्येक बुध्द विहार हे ज्ञानाचे भंडार झाले पाहिजे.तज्ञ प्राध्यापकांनी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्यासचे मत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय आंबेडकर यांनी येथे केले. मरोळ पाईप लाईन, रमाई बुद्ध विहार,अंधेरी पूर्व येथे बौद्ध समाजातील 10 वी आणि 12 वी शिकलेल्या 35 विद्यार्थ्यांचा नवयान बुद्धिस्ट फ्रंट व सन्मान प्रतिष्ठान यांच्या वतीने वह्या,पेन,प्रशस्तीपत्रक,,संविधान उदेशीका व मेडल देऊन गुणगौरव करण्यात आले.
तेंव्हा आंबेडकर बोलत होते. या कार्यक्रमचे स्वागतअध्यक्ष सन्मान प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय धावारे तर सूत्रसंचालन विजय बाविस्कर यांनी केले.याप्रसंगी वकिल मंगेश पवार,वकिल समीर पवार,वकिल अर्चना पांचाळ, बालकलाकार कु.वेदांत कांबळे, सिद्धांत कांबळे, वेसनमुक्ती करणारे भीमराव गमरे बौद्धाचारी विजय बाविस्कर, समाजसेवक कुमार जाधव, गायक देवानंद तांबे, पत्रकार काशिनाथ दवाळे यांच्या हि “समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. रतन अस्वारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी डी. डी. वडमारे, सेवा निवृत्त मनपा अधिकारी के. एस. गायकवाड, कामगार नेते प्रकाश जाधव, पर्यावरण नेते विजय शेट्टी, समाजसेवक दिपक साळवी, परमात्मा गुप्ता आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊ सोरटे, प्रशांत कांबळे, रेखा पाटील, तुळशी कांबळे,सुदेश कडवे, सुरेश गायकवाड, विकास भालेराव, सुनिल कांबळे, जगदीश रमणगुड, प्रमोद गोतपागर, किरण जाधव, सुनिल कदम, विश्वास आढाव, गणेश ठोकळे, किशोर रणशूर, मिलिंद गमरे, विजय सोनताटे, दिलीप कांबळे, सचिन लादे,रवींद्र गांगुर्डे, विक्रम गायकवाड, सतील कांबळे, विष्णु कांबळे राजेंद्र आंबवडे आदि सहकाऱ्यांनी सहाय्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत