घाटकाेपर दूर्घटना प्रकरणी चाैघा विरूध्द आराेप पत्र
घाटकोपर येथील पंत नगरमध्ये असलेल्या पेट्रोल पंपवर १३ मे २०२४ ला एक महाकाय होर्डिंग वादळामुळे कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.
या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता,
तर ८४ जण जखमी झाले होते.
जी.आर.पी.(G.R.P.)च्या जमिनीवर बेकायदेशीरपणे हे होर्डिंग लावण्यात आल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी आता अटकेत असलेल्या चारही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेला दोन महिने पूर्ण झाले आहेत.
गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने एस.आय.टी.(S.I.D.) मे.न्यायालयात ३,२९९ पानांचे आरोपपत्र दाखल केले.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींविरुद्ध आरोपपत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपपत्रानुसार, सरकारी रेल्वे पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची भूमिका शोधण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 173 (8) अन्वये तपास सुरू राहील.
आरोपपत्रात बी.एम.सी.(B.M.C.)चे दोन अधिकारी आणि सहा अधिकाऱ्यांच्या जबाबांचाही समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत