* विधानपरिषदेने धडा दिला…!!
भास्कर भोजने.
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची ८ मते फुटलीत आणि भाजपचा उमेदवार निवडून आला हे जाहीर झाले…!!
असं पहिल्यांदा घडले का.??
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, यापुर्वी सुद्धा असे अनेकदा घडले आहे…!!
या अगोदरच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना डावलून जगताप यांना निवडून आणले होते. तेव्हा सुद्धा कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी क्रॉस वोटींग केले होते…!!
ज्या आमदारांनी पक्षाचा व्हीप नाकारुन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मते दिली त्या आमदारांवर कॉंग्रेस पक्ष कधीतरी कार्यवाही करतो का.?? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे…!!
क्रॉस वोटींग करणा-या आमदारांवर कार्यवाही होतं नाही म्हणून नेहमी, नेहमी कॉंग्रेस पक्षाचे आमदार क्रॉस वोटींग करतात. काही वेळेला आमदार गैरहजर राहतात त्यांच्या वरही कार्यवाही होतं नाही. प्रत्येक वेळी कारणे वेगवेगळी असतात मात्र जिकंतेय घराणेशाही…!!
आमदार क्रॉस वोटींग करतं नाहीत तर घराणेशाही सांभाळण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाकडूनच क्रॉस वोटींग करण्यासाठी सेटींग लावली जाते…!!
आमदार हॉटेल मध्ये कोंबले आहेत अशी बातमी जेव्हा आली तेव्हाच घराणेशाही सांभाळण्यासाठी क्रॉस वोटींग होणार हे सर्वच सुज्ञ लोकांना कळून चुकले होते…!!
आमदार फुटले हे गवगवा करुन बाहेर दाखविले जाते.हा बनाव आहे. अंदर की, बात अशी आहे की, प्रस्थापित भाजप,कॉंग्रेस ,राष्टवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षांना आपली घराणेशाही सांभाळण्यासाठी प्रत्येक घराणं सत्तेत कायम ठेवण्यासाठी सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची आतून ऐकी आहे….!!
ते एकमेकांचे नातेवाईक आहेत, आणि सत्तेसाठी ते एकमेकांना मते देतात हे ऊघडं गुपीत महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी समजून घेतील तो दिवस लोकशाही साठी भाग्याचा….!!
लोकसभेमध्ये संविधान वाचवा अशी बोंब ठोकली. दलित,मुस्लीम समुहाला भिती दाखविली आणि एका जातीचे ३० खासदार निवडून आणले. हा घराणेशाही चा फंडा आहे…!!
५२% संख्या असलेल्या ओबीसी समुहाचे लोकसभेत आणि विधानपरिषदेत किती प्रतिनिधी आहेत ? यावर चिंतन केले पाहिजे. मते ओबीसी समुहाची आणि सत्ता ठराविक घराण्यांची ही राजकीय भामटेगीरी थांबवली पाहिजे हा धडा ओबीसी बांधवांनी घेतला पाहिजे…!!
लोकसभा आणि विधानपरिषदेत १५% लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समुहाला एकाही जागेवर प्रतिनिधी म्हणून साधे तिकिट सुद्धा दिले नाही. यावरून मुस्लिम समुहाने धडा घेतला पाहिजे. आणखी किती काळ घराणेशाही चालू द्यावी हे मुस्लिम समुहाने शिकले पाहिजे…!!
आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष नको. घराणेशाही साठी तो अडसर ठरतोय म्हणून बसपा आणि वंचित बहुजन आघाडी ला बदनाम केल्या जाते. आणि त्या बदनामी साठी आंबेडकरी विचारवंत म्हणून काही भामट्या लोकांना कामाला लावले जाते हा धडा आंबेडकरी समुहाने घेतला पाहिजे…!!
छोटे छोटे राजकीय पक्ष संपवणे.
ओबीसी समुहाला सत्तेबाहेर ठेवणे.
मुस्लिम समुहाचे सांसदीय अस्तित्व मिटविणे.
आंबेडकरी विचारधारेचे राजकीय पक्ष संपविणे.
अशा प्रकारची रणनीती आखून १६९ घराणे महाराष्ट्रात सत्तेवर मजबूत पकड मिळवून बसले आहेत…!!
१६९ घराण्यांची सत्ता उलथवून सर्वसामान्य नागरिकांना सत्तेत बसवायचे असेल.लोकशाहीचे सामाजिकीकरण करायचे असेल तर ओबीसी, मुस्लिम, आदिवासी, दलित हा समुह एकत्र आला तर १६९ घराणे औषधाला सुद्धा सत्तेत दिसणार नाहीत…!!
ओबीसी, आदिवासी, दलित, मुस्लिम राजकीय दृष्ट्या उदासीन राहीला तर आणखी पन्नास वर्षे घराणेशाही सत्तेतून हटणार नाही…!!
विधानसभा निवडणुक तोंडावर आहे. ओबीसी, दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांनो राजकीय शहाणपणं अंगिकारा. लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे. घराणेशाही ने लोकशाहीचा गळा आवळला आहे, तुमची ऐकीच लोकशाही वाचवू शकते हा धडा घेऊन पुढिल वाटचाल करु या…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत