धम्मकारणाचे अर्थशास्त्र
पोस्ट नंबर ( ९ )
विमलकीर्ती गुणसिरी
बंधू आणि भगिनींनो – भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने सर्व बौद्धांचे ऐक्य साधून त्यांच्या धनाचा एकत्रितपणे वापर करून धम्माच्या प्रसाराला हातभार कशाप्रकारे लावायचा याचा सर्व कार्यक्रम बाबासाहेबांनी त्या संस्थेच्या घटनेतील कलमात लिहिलेला आहे. हे अर्थसहाय्य भक्कम व्हावे म्हणून त्यांनी प्रत्येकाला आपल्या उत्पादनाचा विसावा भाग धम्मकार्यासाठी दान देण्याचे आव्हान केलेले होते.
(कलम २:)-बौद्ध पद्धतीच्या पूजेसाठी बुद्ध विहारी निर्माण करणे.
(कलम३:)-धार्मिक आणि वैज्ञानिक विषयाचे शिक्षण देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्थापन करणे.
(कलम ४:)-अनाथालये, दवाखाने आणि मदतीचे केंद्र चालविणे.
(कलम ५:)-बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी प्रचारकांना प्रशिक्षण देणाऱ्या बौद्ध सेमीनरी सुरू करणे.
(कलम ६:)-सर्व धर्माच्या तोलनिक अभ्यासाला हातभार लावणे.
(कलम ७:)-बौद्ध वाड्मयाच्या प्रशासनाचे कार्य हाती घेणे आणि सर्वसामान्य जनतेला बुद्ध धम्माचे अचूक आकलन होण्यासाठी पत्र आणि पत्रिका प्रस्तुत करणे.
(कलम ८:)-गरज पडली तर भिकूंचा नवा संघ स्थापन करणे.
(कलम ८:)-प्रशासनाचे कार्य करण्यासाठी मुद्रणालय किंवा मुद्राणालये चालविणे.
(कलम १०:)-सामूहिक कार्यासाठी आणि बंधुभाव जोपासण्यासाठी भारतीय बौद्धांचे मेळावे आणि परिषदा भरविणे.
हे सर्व सेवाभावी कार्य आहे. धम्म प्रचाराला हातभार लावण्याचे कार्य आहे.प्रत्यक्ष धम्म प्रचाराचे कार्य नाही. धम्म प्रचारक निर्माण करण्यासाठी सेमिनरी काढणे आणि नवा प्रशिक्षित भिकू संघ निर्माण करण्यास हातभार लावणे हे भारतीय बौद्ध महासभेचे खरे कार्य होते. भारतीय बौद्ध महासभेने धम्म प्रचाराचे कार्य करावे असे बाबासाहेबांनी संस्थेच्या उद्दिष्टात कोठेच म्हटलेले नाही. म्हणून स्वतःच धम्म प्रचार करणे हे त्या संस्थेचे कार्य मुळीच नव्हते. परंतु बाबासाहेबांच्या या सर्व नियोजनाचा विपर्यास झाला आणि धम्म चळवळीचे अक्षरशः पे कट मोडले. यातून सावरण्याची आता वेळ आलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत