देशमहाराष्ट्रमुख्यपान
बुलढाण्यातील शहीद अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना आदरांजली.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई इथं राहणारे अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते शहीद झाले. अक्षय हे लडाखच्या सियाचीन ग्लेशियर इथं तैनात होते.कर्तव्यावर असताना शहीद झालेले अक्षय हे पहिले अग्निवीर आहेत.भारतीय लष्करानं सोशल मीडियावर पोस्ट करत अक्षय यांना आदरांजली वाहिली.याच पोस्टमधून भारतीय सैन्याच्या सर्व श्रेणीतील अग्निवीर-ऑपरेटर अक्षय लक्ष्मण गवते यांनी सियाचीनमध्ये दिलेल्या बलिदानाला मानवंदना दिली.तसंच भारतीय लष्कर गवते कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं शोकसंदेशात म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत