प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

राम नाईक यांनी आयुष्याची संध्याकाळ आटपाडीसाठी समर्पित करावी .

सादिक खाटीक


आटपाडी दि . ११ ( प्रतिनिधी )
श्री . राम नाईक यांनी आयुष्याची संध्याकाळ आटपाडी तालुक्यासह माणदेशाच्या सर्वांगीण चौफेर विकासासाठी मार्गदर्शक नेतृत्वाच्या भूमिकेतून समर्पित करावी, अशी भावनिक साद घालणारी अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .
साहित्यरत्न डॉ . शंकरराव खरात यांच्या जयंतीच्या निमित्ताने आटपाडीत घेतले गेलेल्या साहित्य संमेलनात कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांचा माजी केंद्रीय मंत्री, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल श्री . राम नाईक यांच्या हस्ते आणि माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, डॉ. रवि खरात, ज्येष्ट नेते शिवाजीरावतात्या पाटील, विलासराव खरात इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत फेटा बांधून, शाल पुष्पगुच्छ देत सन्मान करणेत आला . त्यावेळी सादिक खाटीक यांनी श्री. राम नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांना दिलेल्या निवेदनात आटपाडी तालुक्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाचा लेखाजोखाच मांडला . सर्वांगीण, चौफेर विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने आटपाडीकर म्हणून आपण पुढाकार घ्यावा अशी भावना प्रारंभीच सादिक खाटीक यांनी व्यक्त केली .
माणदेशी खिलार जनावरे आणि माणदेशी बकरा, बोकडाच्या मांसाला जी आय मानांकन मिळाले पाहीजे . माणदेशात पिकणारा भाजीपाला, फळे, धान्ये कडधान्ये, दुध, अंडी, बोकडा बकऱ्यांचे उत्तम प्रतिचे मांस, शेतीसाठी, दुध दुभत्यासाठी देशात अग्रगण्य ठरणारी खिलार जनावरे देश – परदेशात तातडीने जाण्यासाठी आटपाडी मार्गे ये – जा करणारे विविध पर्याय निर्माण केले गेले पाहिजेत .
आटपाडी रेल्वे मार्गाने जोडावी . कराड – विटा – आटपाडी – पंढरपुर आणि बारामती – आटपाडी – विजयपूर ( विजापूर ) असे दोन नवीन रेल्वमार्ग होऊ शकतात. त्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हावेत .
आटपाडीला विमानतळ उभारणी अत्यावश्यकच . माणदेशातला माल तात्काळ परदेशात जावा म्हणून माणदेश आणि त्या लगतच्या काही तालुक्यांच्या सोयीसाठी आटपाडी या मध्यवर्ती ठिकाणी विमानतळ उभारले जाऊ शकते. विविध राष्ट्रीय महामार्ग आटपाडी तालुक्याच्या जवळून जातात. विमान तळाला आवश्यक भरपूर आणि मुरमाड मातीही आपल्या भागात आहे . परिणामी इथे विमानतळ उभारणी होऊ शकते आणि देशभर, शेजारच्या देशात विखुरलेल्या लाखो गलाई बांधवांना त्याचा लाभ झाल्याने कोल्हापूर, सिंधुदुर्ग पेक्षाही विमान फेऱ्या इथून अधिक होऊ शकतात.
स्वतंत्र माणदेश जिल्हा व्हावा . जिल्ह्याचे ठिकाण आटपाडीच असावे . सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात राहीलेल्या आणि तिन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आटपाडीला जिल्ह्याचे ठिकाण घोषीत करून स्वतंत्र माणदेश जिल्हा झाला पाहीजे .
आटपाडीला सर्वस्पर्शी संशोधन केंद्र व्हावे . शेती उत्पादने, पशु, पक्षी, जनावरे यांच्यावर संशोधन करणारे केंद्र आटपाडीत झाले पाहिजे .
स्वतंत्रपूर वसाहतीचा जीर्णोद्धार, विस्तार व्हावा . दो आँखे बारह हाथ हा जगविख्यात चित्रपट साकारण्यास प्रेरक ठरलेल्या स्वतंत्रपूर या खुल्या कैद्यांच्या वसाहतीमध्ये लहान कैद्यांचे बोस्टन स्कुल, महिला कैद्यांचे स्वतंत्र जेल, स्थानीक युवक – युवतीना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवस्था साकारून मोठ्या विस्ताराचा स्वतंत्रपुराला नवा आयाम दिला पाहीजे .
आटपाडी सौर ऊर्जा हब व कृषी पूरक व्यवस्था साकारावी . राजस्थानच्या जैसलमेर सारखीच उष्णतेची घनता असलेल्या माणदेशासह आटपाडी तालुक्यात सौर उर्जेचे जाळे निर्माण झाले पाहीजे. तेवढी जमीन तालुक्यात उपलब्ध होऊन कडक उन्हापासून विजेच्या प्रचंड निर्मितीस प्रथम प्राधान्य दिले पाहिजे . एकरी भाडे करार योजने पेक्षा शेतकऱ्याला ऊर्जा उत्पन्नामध्ये भागीदार केले पाहिजे. शिवाय सुमारे दोन हजार नावीन्यपुर्ण वस्तु केल्या जाणाऱ्या पर्यावरण पुरक बांबु लागवडीसाठी, प्राधान्य, प्रोत्साहन देणारी शासनाने भूमिका घेतली पाहिजे, त्यावरील यंत्रणा, व्यवस्था आटपाडी जवळ उभारली गेली पाहीजे .
आटपाडी तालुक्यातील शेत जमिनींना बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा सुरू असलेला प्रयोग युद्ध पातळीवरून पुर्णत्वास गेला पाहीजे. स्वातंत्र्यानंतरच्या सत्तरीपर्यत आमच्या हक्काचे हजारो टीएमसी पाणी वापरणाऱ्या सधन भागाकडून, आमच्या दुष्काळी भागाला पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी घेतली गेली पाहीजे . किमान २५ – ३० वर्षे अशा न्यायाचे धोरण स्विकारले पाहिजे .
पुराच्या प्रचंड पाण्याने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शहरे चिंताग्रस्त बनली आहेत . त्यावर उपाय म्हणून दुष्काळी तालुक्याच्या सर्व भागात पोहचेल अशा वर्तुळाकर प्रचंड मोठ्या बोगद्यातून हे नद्यांचे प्रचंड पाणी १०० – १५० किमी पर्यत नेले वळवले पाहिजे . हे ४०० – ५०० फुटा खालून सायफन ने येणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना उपसून वापरण्यात मोठे सोयीचे, फायद्याचे ठरेल . शिवाय नद्यांचा महापूराचा धोकाही टळेल . सुमारे ३ टीएमसी क्षमतेचा राजेवाडी तलाव गाळमुक्त करावा . आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव राजेवाडी तलावाशी जोडणारा मोठा कॅनाल ( कालवा ) निर्माण केला जावा . आटपाडी तालुक्यातील सर्व गावांना कृष्णा नदीचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी १०० कोटी रुपये खर्चाची आणि ८० टक्के काम पुर्ण झालेली तथापि ७ वर्षापासून ठप्प असलेली धनगाव योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करावेत .
बेंगलोर कॉरीडोरच्या धर्तीवर सुमारे २० हजार कोटी रुपयाच्या गुंतवणूकीची शेकडो एकरातील औद्योगिक वसाहत आटपाडी लगत उभारली जावी . शेती, शेतीपुरक व्यवसाय, पशु पक्षी इत्यादीवर संशोधन करणारे, ज्ञानदान देणारे राम नाईक कृषी विद्यापीठ आटपाडी उभारले जावे .
साहित्यरत्न शंकरराव खरात यांचे १०० कोटी खर्चाचे स्मारक आटपाडी येथे साकारावे . औंधचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी, महाराष्ट्र वाल्मीकी ग . दि . माडगुळकर, थोर साहित्यिक व्यंकटेशतात्या माडगूळकर, साहित्यरत्न शंकरराव खरात, थोर साहित्यिक ना .सं. इनामदार या आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेल्या पाच साहित्यीकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे . या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी आपण स्वतः ( श्री . राम नाईक साहेब ) पुढाकार घ्यावा . स्वागताध्यक्ष स्वत : व्हावे आणि तुमच्या संबंधातल्या कोणत्याही विभागाच्या पुढाकाराने हे साहित्य संमेलन आटपाडीत होण्यासाठी आपले प्रयत्न सत्कारणी लागावेत .
आपण आटपाडी तालुक्याचे पितामह आहात. असे आम्ही मानतो . तुमच्या आयुष्याच्या उत्तरार्थातील काही काळ तुम्ही आटपाडी तालुक्यासाठी समर्पित करावा अशी आमची अपेक्षा आहे . आपण उपराष्ट्रपती, राष्ट्रपती किंबहूना उत्तम पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे आहातच . केंद्र सरकार, राज्याचे सरकार आणि या व्यवस्थेला आकार देण्यास कारणीभुत ठरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आपल्या शब्दाला मोठा मान आहे . आपणाकडून भविष्यात आटपाडीकर या नात्याने आटपाडी तालुक्यासह माणदेशाच्या प्रचंड विकास परिवर्तनाचे प्रयत्न होतील . आपण यापुढे आटपाडी तालुक्याचे मार्गदर्शक नेते म्हणून कार्य करावे अशा अपेक्षा, सदिच्छा, सदभावना सादिक खाटीक यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त करून मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!