नळदुर्ग येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावे व गोवंश हत्या बंदी कायदाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम कुरेशी समाजातील व्यापारी बांधवार होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी : रिपाइं (आठवले) ची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी) :
नळदुर्ग ता.तुळजापूर येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावे व तसेच गोवंश हत्या बंदी कायदाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम कुरेशी समाजातील व्यापारी बांधवार होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी या प्रमुख मागण्या सह अन्य महत्त्वाच्या मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने वतीने केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारता मंत्री रामदास आठवले व संबंधित जिल्हाधिकारी धाराशिव यांना लेखी निवेदना द्वारे करण्यात आल्या आहेत .
या संदर्भा रिपाइं (आठवले )च्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यातील बौद्ध नगर नळदुर्ग येथे गट नंबर २९ मधिल गावठाण जमिनी पैकी १ हे =१३ आर इतकी जमीन हरीजन वस्ती वाढीसाठी संपादीत केलेली असून सदर जमीन वर गेल्याअनेक वर्षांपासून घर करून राहत असलेल्या अतिक्रमण धारकांच्या नावे त्यांचे अतिक्रमण नियमित करुन्व् भोगवाटदार म्हणून ७/१२ उताऱ्यावर त्यांची नोंद घेवून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा तसेच गोवंश हत्या बंदी कायदाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम कुरेशी समाजातील व्यापारी बांधवार होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात यावी आदी प्रमुख मागण्या सह अन्य विविध मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं चे पॅंथर तानाजी कदम, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रणजीत गायकवाड, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं युवा आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइं युवा आघाडी चे धाराशिव शहर कार्याध्यक्ष प्रवीण बनसोडे,रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तुळजापूर तालुक्याका अध्यक्ष बाशिद भाई कुरेशी, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, प्रकाश बनसोडे, जेष्ठ कार्यकर्ते नामदेव आण्णा बनसोडे सह रिपाइंच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत