“पूज्य भदंत डाॅ.उपगुप्त महाथेरो” हे अनेक वर्षानंतर धाराशिव जिल्ह्य़ात
महाराष्ट्रातील धम्म चळवळीला योग्य दिशा देणारे “पूज्य भदंत डाॅ.उपगुप्त महाथेरो” हे अनेक वर्षानंतर धाराशिव जिल्ह्य़ात येत आहेत त्या निमित्तानं-
वर्षावास महोत्सव धाराशिव
रविवार दि 4 ऑगस्ट 2024
सकाळी 10:30 पासून
परम पूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची धुरा पूज्य भंते उपगुप्त महाथेरो यांनी वयाच्या पंधराव्या- सोळाव्या वर्षी आपल्या खांद्यावर घेतली .ती आज पर्यंत अविरत घेतली आहे .
चळवळीत यश – अपयशाची चिंता न करता कसल्याच सुखसोईचा विचार न करता कधी पाई चालून तर कधी बैलगाडीतून धम्म चळवळ गतीमान करण्याच काम भंतेजींनी केले आहे .
महाराष्ट्रातील सर्व धार्मिक काम करणारे व्यक्ती , आणि राजकीय लोक भंतेजीचा आशिर्वाद घेण्यासाठी येत असतात.
भंतेजीचा जनसंपर्क दांडगा आहे , सामान्य व्यक्ती पासून असामान्य व्यक्ती भंतेजींना आदर्श मानतात.
भंतेजीं च्या परिश्रमातून आणि दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील धम्म चळवळ यशाच्या शिखरावर पोहचत आहे .
- बौद्ध धम्माचा ऐतिहासिक आणि जागतिक वारसा स्थान असलेलं ठिकाण म्हनजे अजिंठा- या ठिकाणी भंतेजीं च्या परिश्रमातून 74 एकर जागा पाली विश्व विद्यापीठ निर्माण करण्यासाठी घेण्यात आली आहे . अजिंठा परिसरात 51 फुट उंच इतकी मोठ्ठी तथागत बुद्धांची लाल दगडातील मुर्ती बसविण्यात आली आहे . या परिसराचा विकास करण्यासाठी तीन हजार कोटी खर्च होणार आहे , आणि इतकं मोठ्ठ नियोजन भंतेजी करत आहेत .
- परभणी जिल्ह्य़ातील पूर्णा या ठिकाणी भंतेजी वास्तव्यास असतात या ठिकाणी सुद्धा भव्य बुद्ध विहार, मोठ्ठ वाचनालय निर्माण करण्यात आले आहे.
- दाभड – नांदेड या ठिकाणी बावरी महाबुद्ध विहारची निर्मिती करण्यात येत आहे, या ठिकाणी साधारण पन्नास कोटी खर्च करून महाविहार निर्माण केले आहे , भारतातील सर्वात मोठ्ठा आणि उंच अशोक स्तंभ या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे . हा परिसर साधारण दहा एकर मध्ये पसरलेला आहे .
- हिंगोली येथे हि एका बुद्ध विहाराची निर्मिती भंतेजीं च्या परिश्रमातून झाली आहे या विहारास तीर्थ स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे
- देवगाव फाटा या ठिकाणी बुद्ध विहाराचे काम चालू आहे .
- लातूर जिल्ह्य़ात रामेगाव रोड या ठिकाणी भंतेजीं च्या मार्गदर्शनाखाली नऊ एकर जागा खरेदी करून सातकर्णि महाविहाराची निर्मिती करण्यात येत आहे .
- बीड जिल्ह्य़ात शिवणी या ठिकाणी पाच एकर जागा खरेदी करून महाविहाराची निर्मिती करण्यात येत आहे .
अशा दूरदृष्टी असलेल्या भंतेजींचे दर्शन व मार्गदर्शन तगर भूमी गडदेवदरी परीसर ता.जि.धाराशिव येथे होत असलेल्या वर्षावास महोत्सवात होणार आहे . आपण या कार्यक्रमास उपस्थित राहुण भंतेजीं च्या धम्म देसणेचा लाभ घ्यावा.
चळवळीत सहभागी व्हावे.
✍️
भंते सुमेधजी नागसेन ( संस्थापक अध्यक्ष- तगर भूमी धाराशिव )
9960498358
टिप – तगर भूमी हे ठिकाण उस्मानाबाद शहरापासून गडदेवदरी या निसर्गरम्य ठिकाणी आहे , ठिकाणास जाण्यासाठी गडपाटी पासून जाता येते रस्ता तयार झालेला आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत