धम्मकारणाचे अर्थशास्त्र
भदन्त
विमलकीर्ती गुणसिरी
बंधूंनो आणखीन एक दुसरा प्रकार आहे परित्राण करण्याचा. बुद्ध धम्मा परित्तदेसना असते. बुद्धाने जे जाणले आणि ज्यामुळे दुःखापासून त्याचे रक्षण झाले ते आपण जाणून घेण्यासाठी जाणकार भिकू भिकुनीकडून उपदेश (पाली देसना) घ्यायचा असतो. म्हणजे एखादी शिकवण समजून घ्यायचे असते. त्याला परित्त-देसना किंवा परित्तपाठ असे म्हणतात. परंतु अडाणी भिकूंनी केवळ सुत्तपटनाच्या प्रथा निर्माण करून या परित्तदेसनेचा अक्षरशः हिंदूधर्मामधील सत्यनारायण करून टाकला आहे. भिकू ने रात्री अप रात्री उपासकाच्या घरी जायचे नसते. परंतु काही विकू केव्हाही वेळी अवेळी जाऊन परित्राणाचा कार्यक्रम करतात. काही तर कायम तेच काम करीत असतात. भली मोठी यादी देऊन उपासकांना नको त्या गोष्टी आणायला लावतात. भरपूर दान मागतात. कमीत कमी पाचशे रुपये दिलेच पाहिजेत असे बजावतात. भिकू चे नुसते पाय जरी घराला लागले तरी घर पवित्र होते, सर्व संकटे टाळतात अशी अंधश्रद्धा पसरवितात. परित्राणाच्या नावाने कायम एका विहारातून दुसऱ्या विहारात आणि एका घरापासून दुसऱ्या घरी फिरत राहतात. त्यातून प्रत्येक ठिकाणी भरपूर दान मिळते. एकाच वेळात राहिल्याने स्थानिक लोक दररोज देऊन देऊन किती दान देतील ? म्हणून काही भिकू वर्षावासातही अनेक विहारात फिरत राहतात. कारण प्रत्येक ठिकाणी नवनवे लोक येत असल्याने निश्चित दान मिळतेच. अशाप्रकारे भिकू नुसते दानाच्या नावाने कमविण्याच्या नादी लागले आहेत. हिंगोली गावात तर मला नवलच ऐकायला मिळाले. तेथील भिकू दररोज काही घरी दान मागत फिरत असतात. शे 200 रुपये दिले तर ते घेत नाहीत. कमीत कमी पाचशे रु. मागतात आणि पुढे हजाराच्या पटीत द्या म्हणतात. ही लुटमार थांबवायला नको का ? भिकू स्वतःचा अभ्यास वाढवीत नाहीत आणि आचरणाचाही सराव करीत नाहीत. फिरत राहिल्याने ते कसे होईल ? पण त्यांच्या दृष्टीने अभ्यास आचरण महत्वाचे नाही, तर दान मिळविणे महत्त्वाचे आहे. मग त्या दानाचे हे भिकू करतात तरी काय ? जे काही करतात ते सर्वांना माहीत आहे. हा असा सुद्धा एक मोठा धंदा होऊन बसलेला आहे. दान मागून भिकूंनी बौद्धांच्या आदर्श परंपरा धुळीस मिळविल्या आहेत. संघाला बदनाम केलेले आहे. त्यामुळे लोकांनी श्रद्धेने दिलेले दान असे लबाडांच्या घशात जाते आणि खऱ्या धम्म प्रचाराला सहाय्य मिळाला असे होते. शेवटी धम्मकार्याचीच बरबादी होते. तिसरा प्रकार आहे विधी करण्याचा. वास्तविक पाहता विधी करणारांचा वर्गच मुळे बौद्धपरंपरेत कधी निर्माण झालेला नाही. परंतु आपल्या देशात निरनिराळ्या नावाने, जसे बौद्धाचार्य, धम्मचारी, महाउपासक, माजी सामनेर वगैरे नावांनी विधी करणारांचा एक पुरोहित वर्ग निर्माण झालेला आहे. तो आपल्या मनाप्रमाणे विधी करण्याची फी उकळत असतो. बौद्ध परंपरेत हे काम भिकू भिकूंनी तसेच उपासक उपासिका वर्ग करीत असतो. परंतु त्यांची सेवा विनामूल्य असते. भिकू ने खरे तर कधी काही मागायचेच नसते. पुरोहितगिरी करायची नसते. परंतु भारतात अशा अनेक नावांनी पुरोहित निर्माण करून लोकांनी धम्मपरंपरा भ्रष्ट केलेली आहे. त्यातून सर्वसामान्य माणसाची लुटमार चालविलेली आहे आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे पेकाठ किंवा कंबरडे मोडले आहे. भिकू सुद्धा दानाच्या नावाने भरमसाठ फी उकळीत असतात. उपासकाने श्रद्धेने दिलेल्या दानाचा स्वीकार करून ते त्यांचा अक्षरशः अपमान करीत असतात. या सर्व गोष्टींना आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी सेमिनिरीच्या माध्यमातून आम जनतेचे प्रबोधन झाले पाहिजे तसेच प्रशिक्षित प्रचारक घडविले पाहिजे पण लक्षात कोण घेतो ?
बांधवांनो पुढील भाग पोस्ट क्रमांक आठवर जरूर वाचावा ही विनंती.
””””””””””’’’’
X
“””””””””””””””””””””””””””””””””

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत