महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

बौद्ध राजकारणात अस्पृश्यच का?
लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये बौद्धांना काय मिळालं, फक्त दुसऱ्यांचा म्हणजेच काँग्रेसचा जय करण्यामध्ये आपण वेळ वाया गेला,
दीक्षाभूमी प्रकरणांमध्ये एक सुद्धा काँग्रेसचा किंवा उद्धव ठाकरे गटाचा किंवा शरद पवार गटाचे एकाही खासदारांनी किंवा आमदाराने शब्द काढलेला नाही आणि बौद्ध समाजाने यांना भरघोस असं मतदान केलं काय भेटलं मतदान करून एकदा चिंतन करायला हवं
प्रणिती शिंदे या निवडणुकीमध्ये विजयी होण्यामागे सर्वात मोठा वाटा हा बौद्ध (अजूनही महाराच)समाजाचा आहे कारण ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे 2014 लोकसभेची निवडणूक लढवीत होते त्यावेळेस शरद बनसोडे या बौद्ध समाजाच्या व्यक्तीने त्यांचा पराभव केला होता, तसेच 2019 सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर निवडणुकीत होते आणि शिंदे यांचा पराभव झाला खरंतर शिंदे यांनी बाबासाहेबांच्या उपकारांची जाण ठेवून ती जागा बाळासाहेबांना सोडायला हवी होती पण ते त्यांनी सोडली नाही म्हणजे दोन्ही वेळेस बौद्ध मतदार हा सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत नव्हता त्यामुळे त्यांचा पराभव झाला, पण या निवडणुकीत बौद्ध समाज प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे थांबला त्यामुळे त्यांच विजय सोपा झाला कारण स्वतःच्या शेअर मध्ये अवघ्या त्या सातशे मताने आघाडीवर आहेत बौद्ध मतावर निवडून येऊन सुद्धा प्रणिती शिंदे यांनी दीक्षाभूमी बद्दल एक सुद्धा शब्द बोललेला नाही आणि आमचे लोक म्हणतात की या मॅडमला समाजाचे प्रश्नासाठी संविधान वाचवण्यासाठी निवडून दिला आहे
बौद्धांनो जागे व्हा
प्रत्येक पक्ष हा आपल्या मताचा वापर करून घेतो आपल्याला प्रतिनिधित्व देत नाही एकेकाळी चार बौद्ध खासदार असायचे आता ती संख्या किती वर आली आहे तपासून पहा
2019 ला महाराष्ट्र मध्ये बौद्धांची राजकीय ताकद वाढली होती त्याचे कारण बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतल्यामुळे पण ती 2024 ला पूर्णपणे संपलेली दिसून येत आहे याला कारण बौद्ध समाजाचा आहे कारण आम्हाला गुलामीची सवय लागून गेलेली आहे दुसऱ्या पक्षाची उजरेगिरी करण्यातच आपल्या वाढ वडिलांचे आयुष्य गेले आहे आपणही आता तेच करू तर येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या पक्षाची कास धरा आणि येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्वल करा
✍️ प्रेम फडतरे ✍️
8265038086

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!