अब्राहम लिंकन तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते..
अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पाहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती उठून उभे राहिले आणि लिंकन ला उद्देशून म्हणाले ,” मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका कि तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते “
सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं कि याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे आणि त्यांची लायकी दाखवली आहे. मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक ? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठे पणा सिद्ध करतात, ते हि अगदी शांतपणे !! लिंकन हि असेच !!
सभागृह काय होणार याकडे जीव कान आणि डोळ्यात आणून पहात होतं. प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली ,आणि त्याला म्हणाले ,
“सर , मला माहित आहे हे , कि माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत कि ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट आणि पादत्राणे बनवत होते कारण त्यांच्या सारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं “
” ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते , त्यांच्या हातात जादू आणि कला होती , त्यांनी बनवलेल्या चप्पल -बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते , आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे , तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय ? कारण हे कसब मलाही अवगत आहे कि हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन. पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!”
सर्व सभागृह बधिर झाल होतं , कोणाला काय बोलाव हे सुचत नव्हतं , अब्राहम लिंकन हि काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती.आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.
मित्रानो , यातून एकाच गोष्ट लक्षात घ्या , प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका ,कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या
” आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका
” काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते !!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत