महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

राजर्षी शाहू महाराज नवसमाज रचनेचे शिल्पकार


-डॉ. सुभाष वाघमारे
सातारा – राजर्षी शाहू छत्रपती हे मनुवाद्यांशी निकराने झुंज देणारे आधुनिक नवसमाज रचनेचे शिल्पकार , लोककल्याणकारी ग्रेट महाराजा होते, असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त डॉ. सुवर्णा यादव, प्राचार्य डॉ.संजय कांबळे, लेफ्टनंट डॉ.केशव पवार व प्रा.तानाजी देवकुळे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाच्या शताब्दी निमित्त लंडन येथे आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत सहभागी झालेले छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राध्यापक डॉ .सुभाष वाघमारे , डॉ.केशव पवार व तानाजी देवकुळे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांच्या प्रबंधाचे महत्व विषद करून लंडन परिषदेतील अनुभव कथन केले.ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यावेळी उपस्थित होते.
डॉ. वाघमारे म्हणाले, शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणाचा ब्राह्मणी वर्चस्ववादाचा कटू अनुभव आला. त्यांनी त्यांच्याशी विवेकाने कठोर मुकाबला केला. शेतकरी, स्त्रिया, वंचित समाजाच्या उत्थानासाठी अखंडपणे असंख्य सामाजिक शैक्षणिक मौलिक विधायक कामे करुन पुरोगामी विचार जोपासला तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांतील उद्दिष्टांची पायाभरणी केली आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तसेचभारताचे मोठे नेते होतील असे द्रष्टे भाकीत महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये व्यक्त केले होते. ते अक्षरशः खरे ठरले आहे.
शाहू महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे चरित्र लिहिण्याचे वचन अखेरच्या समयी घेतले होते. ते प्रबोधन करांनी पूर्ण केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी सातारा येथील बोर्डिंग ला महाराजांचे नाव देऊन त्यांच्या विचारांचा वारसा सार्थ केला आहे.

रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. प्रारंभी डॉ.सुधा होवाळे, डॉ. रवींद्र हर्षे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती बाळासाहेब शिरसाट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!