“मिशेल मार्श ने विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो क्रिकेट विश्वाला दुखवून गेला. काय म्हणाले मोहम्म्द शमी”

वन-डे विश्वचषक अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. यावेळी कांगारूंनी मोठा जल्लोष केला. तर ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शचा एक फोटो क्रिकेट विश्वाला दुखवून गेला. मार्शन विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. आता या फोटोवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन खेळाडूला लक्ष्य केले. तो म्हणाला, मिशेल मार्शचा ट्रॉफीसोबतचा असा फोटो पाहून मला वाईट वाटते. ही तीच ट्रॉफी आहे, जिच्यासाठी जगभरातील संघ भिडत होते, जिंकल्यावर तिला डोक्यावर घेऊन मिरवायचे असते; पण मार्शन तिच्यावर पाय ठेवला. हे पाहून खूप वाईट वाटले, असे शमीने सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत