देशभारतमुख्य पानमुख्यपान

संसदेनं संमत केलेल्या तीन फौजदारी विधेयकांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची मंजूरी

संसदेत मागील आठवड्यात फौजदारी गुन्ह्यांमधील मुख्य कायद्यांसंबंधीची ही सुधारित तीन विधेयकं संमत केली होती. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष संहिता २०२३ या विधेयकांना मंजूरी दिली आहे. यामध्ये भारतीय दंड संहिता कायदा १८६० या कायद्याऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३ अंमलात येणार असून; अपराध प्रक्रिया संहिता १९७३ च्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा द्वितीय संहिता २०२३ अंमलात येणार आहे; नव्याने मंजूरी देण्यात आलेल्या या कायद्यांमुळं महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंबंधी नवीन बदल केले गेले आहेत तर पहिल्यांदाच दहशतवादाचा बीमोड करण्यासाठीदेखील काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर भारतीय साक्ष अधिनियम १८७२ ची जागा भारतीय साक्ष द्वितीय विधेयक २०२३ घेणार आहे. हे विधेयक न्यायालयात पुरावे सादर करणे आणि त्यांचा स्वीकार करणे यासाठी वापरले जाणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!