तालुक्यातील शेतकरी व सर्व सामान्य नागरीकांची प्रलंबीत कामे मार्गी लावणार : – जगदाळे
अशोक जगदाळे यांना विधान भवनात पाठविण्याचा महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार
नळदुर्ग येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे करण्यात आली होते आयोजन
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
तुळजापूर तालुक्यातील शेतकरी ऊस व दूध उत्पादक मजूर शेतमजूर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर चौकशी करून गावोगावी संवाद करीत तुळजापूर मतदार संघांमध्ये जे जे कामे रखडलेली आहेत असे सर्व कामे मार्गी लावणार असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा दृष्टी समूहाचे उद्योजक अशोक जगदाळे यांनी व्यक्त केले
नळदुर्ग येथे नळदुर्ग शहराचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस [ शरद पवार गटाचे ] नेते अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे बी .के . फंक्शन हॉलमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळेस ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते .
ते पुढे म्हणाले तुळजापूर मतदार संघांमध्ये अनेक कामे प्रलंबित असलेले दिसून आले मी प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत जाऊन प्रत्येक नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ,अनेक गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य , काही आजी माजी पं स सदस्यां सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून अनेक नागरीकांच्या समस्य सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आसल्याचे मत अशोक जगदाळे यांनी व्यक्त केले जे ही कामे करावयाची आहेत ते काम महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रितपणे येऊन जे प्रलंबित कामे आहेत ते कामे पूर्ण करणार आहोत आसे परखड मत ही अशोक जगदाळे यांनी व्यक्त केले .
नळदुर्ग येथे नुकताच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस ते बोलत होते .
या कार्यक्रमास अणदूर येथील सरपंच रामचंद्र आलुरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, माजी नगरसेवक इमाम शेख, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगर सेवक महालिंग स्वामी, माजी नगर सेवक अमृत पुदाले, माजी नगरसेवक विनायक अंहकारी, सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे .,संजय जाधव, मुनीर शेख, मुकुंद नाईक, नवलकुमार जाधव , अमित शेंडगे शिवसेना शहर प्रमुख संतोष पुदाले, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख महेबूब शेख, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, बंकट बेडगे , सत्यवान सुरवसे, काॕग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, सरदारसिंग ठाकूर, गोविंद देवकर, होर्टीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले, कृष्णात मोरे, , डॉ बालाजी जाधव, विलास पुदाले, कनगऱ्याचे सरपंच मधुकर गंगणे, उपसरपंच सुरज इंगळे, युवराज पिंपळे , माजी .सरपंच अमोल मस्के काटीचे सरपंच सुजित हंगरगेकर , काटगावचे दीपक माळी, शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके, मंगरूळ गावचे डोंगरे महाविकास आघाडीचे भरगच्च कार्यकर्ते या शेतकरी मेळाव्यास व दृष्टीसमूहाचे उद्योजक अशोक जगदाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशोक जगदाळे यांना विधानभवनात पाठवण्यासाठी कंबर कसली आहे .विधान भवनात पाठवण्याचा निर्धार केला आहे .
नळदुर्ग शहराचे सुपुत्र दृष्टीसमूहाचे उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेस [ शरद पवार गटाचे ] कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांना विधानभवनात पाठवण्याची वज्रमुठ बांधली आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत