महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

करूया धम्मक्रांती…..

सुरेश भवर

धम्म  चक्राला गती देऊया 
    हजारो वर्षापासून या भारत भूमीवर शोषित, पीडित, शूद्र अतिशूद्र   , दलित यांच्यावर भयानक अत्याचार करण्यात आले, व आजही या अत्याचाराची मालिका चालूच आहे. सुनियोजित हत्याकांड, फासेपारध व स्त्रियांवर अत्याचार, शूद्रांच्या मिळकतीचे नुकसान आणि बळजबरीने मालमत्तेवर कब्जा या सर्वांना कंटाळून बहुजनांचे महान उद्धार मार्ग दाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म परिवर्तनाचा मार्ग स्वीकारून मुक्तीचे द्वार खुले केले. परंतु बाबा नंतर हे कार्य फार धीम्या गतीने चालू आहे. त्याला वेग देण्याचे कार्य मोठ्या कठीण प्रयत्नाने काही समाज कार्यकर्ते करीत आहेत. परंतु शोषितांचे नेते आपल्याच स्वार्थात मजबूर आहेत. आणि त्याप्रमाणे काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी समाजाचे विभाजन करीत आहे. चावड्यांचे बुद्ध विहारात रुपांतर केले पण त्यांना व आधुनिक बुद्ध विहारांना परत चावडीचे स्वरूप देण्याचे काम काही मंडळी करीत आहे.

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म प्रवर्तन केले ते त्यांनी सर्व धर्माचे संशोधन करून कसोट्या लावून निर्णय घेतला आहे. आज ज्या दलितांनी शुद्रांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या निर्णयावर विश्वास दाखवून हजारो वर्षाची गुलामगिरी नरक यातना झुगारून दिल्या. त्यांना सुखद जीवनाचा आनंद प्रतीत होत आहे. त्यांची प्रगती कडे वाटचाल होत आहे धम्म प्रवर्तनानंतर सनातनी धर्म वेड्या कडून धमक्या प्रलोभणे गंभीर अफवा सर्वकाही प्रवर्तित जनतेला मिळत आहे जसे डॉक्टर बाबासाहेबांना मिळाले होते तसे.  यूपीतील चंद्रशेखर आझाद यांना तसेच राजस्थान गुजरात अशा अनेक राज्यातून दलित नेताना धमक्या आजही मिळतात त्यांच्यावर खुनी हल्ले होतात. परंतु शोषितांनी बहुजनांनी अस्पृश्यांनी वंचितांनी याला घाबरायला नको, त्यांनी खालील गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

बौद्ध धम्म कामधंदा, उदरनिर्वाह नंतर शांतीसाठी दुःखात सांत्वनासाठी किंवा मनशांती, सामाजिक कार्यात एक अदृश्य सहारा आहे.

   भारताची मानसिकता पूर्णपणे जातीवादी दांभिक आहे. जे आदर्शवादी प्रगतिशील हिंदू स्वतःला समजतात, तेच वर्णवादाचा, जातीयवादाचा छुपा अजंडा राबवू पाहतात आणि त्यासाठी छुपी मदतही करतात. गांधीजी सर्व वर्णांची तरफदारी करीत होते. काही नेते अस्पृश्यांसाठी वेगळ्या मंदिराची व्यवस्था करू पाहत होते. साम्यवादी वर्ग लढा लढवतात म्हणून ते वर्ण लढा चालवीत नाही ते तसे फक्त भासवतात म्हणून अस्पृश्यांनी शूद्र जनतेने व वंचितांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये.

     बौद्ध धम्म परिवर्तनामुळे अस्पृश्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक उत्कर्ष झाला आहे. बौद्ध धम्मामुळे बौद्धिक विकासाला जास्तीत जास्त चालना मिळाली आहे. भारतातील सर्व शूद्र अतिशूद्र यांनी विश्वास ठेवावा की, या नरक यातनातून सुटका झाल्यानंतर निश्चितपणे तुमचा उद्धार होईल. या पिंजऱ्यातून सुटका होतात शूद्रांचे मानसिक ओझे उतरेल. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि देव धर्म हा प्रमुख अडसर दूर होतो आणि त्यांचे आत्मबल वाढते . वाढलेले आत्मबल प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी कोणत्याही दिशेला सहायता करते.

          इंग्रजांची एक बहुचर्चित नीती होती. आता हीच नीती भारतीय शासन पत्र पत्रिकांनी आणि टीव्ही माध्यमांनी, सोशल मीडियाने आत्मसात केली आहे. त्यांनी प्रथम वर्ण आणि खालच्या जातीत फोडाफाड केली.

  नंतर आंबेडकरी जनतेतही फोडाफाड केली. दलित पॅंथर रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन समाज पार्टी आणि त्या पक्षांचे अनेक गट यामध्ये ही स्वार्थासाठी कलह लावून दिला. पण सर्व आंबेडकरवादी पक्षांना सांगणे आहे, तुम्ही एकाच बापाची लेकरे आहात, एका विचाराने एका ध्येयाने प्रेरित आहात. आपसात भांडून आंबेडकरी चळवळीचे नुकसान करू नका. हे आंबेडकरी जनतेला कळकळीची विनंती, बाबासाहेबांनी चळवळीचा पुढे आणलेला रथ मागे जाईल. धम्मकार्याला, सामाजिक कार्याला, आणि राजकारणाला सुद्धा खिळ बसेल.

    जगातील कोणताच धर्म शूद्रांना व स्त्रियांना न्याय देऊ शकला नाही. फक्त बुद्ध धम्मच त्यांना न्याय देऊ शकला. आजही दलित मुसलमान व काही दलित ख्रिश्चन म्हणून जीवन जगत आहे. त्यांची शूद्रता कमी झाली नाही ते आजही हिन दिन आहेत. आपण त्यांचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये अनेक विसंगती दिसून येतील. यावरून आपण एकच धडा घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला तो शूद्र दलित किंवा हिन दिन न राहण्यासाठी बौद्ध धम्माची व्यक्ती प्रबुद्ध होऊन बुद्ध बनू शकते म्हणजे बुद्धिवान प्रज्ञावान. पण इतर धर्माप्रमाणे प्रेषित किंवा देवाचा पुत्र बनण्याचा अधिकार कधीच मिळत नाही, म्हणून प्रज्ञाने जगण्यासाठी स्वराष्ट्रीय बौद्ध धम्मच शूद्रांनी, बहुजनांनी, वंचितांनी तसेच गावाबाहेरचे डोंगर खोऱ्यातील भटक्या विमुक्त जमातीने सुद्धा या हितावह धम्माचा स्वीकार करावा.
    बौद्ध धम्म भारताचा सर्वश्रेष्ठ धम्म आहे, जगण्याचा मार्ग आहे. कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धम्मातील साहित्य भंडार हे सुसंपन्न आणि सुप्रभावित आहे.  धर्म अतिरेक्यांनी अनेक महत्त्वाची ग्रंथ जाळली आणि विद्यालय विद्यालयाचा नाश केला. तरीही आज बौद्ध साहित्याशी कोणी बरोबरी करू शकत नाही. एकट्या तिबेटमध्ये अंजुर आणि तंजूर या मालिकेची 4500 ग्रंथ सध्या सर्व जगाला प्रभावित करीत आहे.

   स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे टिळक बोलले पण अधिकारवासी आम्ही अनार्य आधी भारतवासी आहोत. हा अधिकार आपला आहे आणि तो आपण धम्म प्रवर्तन करून मिळविला पाहिजे. नंतर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य मिळवू शकाल. यासाठी जातीयवादी धर्माचा त्याग करून पहिल्या स्वातंत्र्याकडे तीव्र गतीने गेले पाहिजे.  
धम्म परिवर्तन इतर शूद्र व बहुजनांसाठी एक साधन आहे. साध्य तर मूलभूत लोक तांत्रिक अधिकार आहेत. ते सर्व नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी गर्जना केली की, मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन’ ते कार्य व ती प्रतिज्ञा आपण लवकरात लवकर सनदशिर मार्गाने वेगाने करायला हवे. म्हणूनच आपल्या बेजबाबदार मानासाठी हापापलेल्या लोकांनी आपले कर्तव्य ओळखून आंबेडकरी कार्यास वाहून घ्यावे आपली कृतज्ञता बाबासाहेबांच्या प्रति व्यक्त करावी.


सुरेश भवर????
फोन नंबर: 9970623745

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!