सत्तेच्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नवीन खासदार-आमदार-नगरसेवक तुमच्या/मविआच्याच पक्षात जन्मावेत हे सुद्धा आम्हाला मान्य नाही!

———————-विशाल हिवाळे
लोकसभा निवडणूकीत भाजपने दिलेला 400 पारचा नारा रोखण्याची कामगिरी आंबेडकरवादी समाजाने चोखपणे बजावली. मविआला त्यामुळे महाराष्ट्रात घवघवती अनपेक्षित यशही मिळालं. खरंतर 400पार च्या नाऱ्याला महाराष्ट्रात सुरूंगच लागला.या सुरूंगाच्या वातील पेटविण्याचं काम महाराष्ट्रातील आबेडकरवादयांनी केलंच पण संबध देशातही यात प्रमुख भूमिका पार पाडली.मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासह, सामाजिक संघटना/चळवळींचाही यात सिंहाचा वाटा आहेच.
भाजपला रोखलं, संविधान वाचलं. आता पुढे काय? हा प्रश्न माझ्या सहीत असंख्य कार्यकर्त्यांना भडसावतोय.सत्ते शिवाय पर्याय नसल्याची भावना,महाराष्ट्रातल्या बहुसंख्य आंबेडकरवादी जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात आहे. सत्तेत प्रवेश करायचा असेल तर सर्व गटांना एकत्र यावेच लागेल.मविआला आपण लोकसभेत साथ दिलेली आहे.विधानसभेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्याच पाहिजेत.संविधान वाचवायचे असेल तर मविआची पण नैतिक जबाबदारी आहेच.तुमच्या करिता सदैव सत्तेची कवाडं उघडी करणं म्हणजे संविधान व लोकशाही वाचवली असं होत नाही.नाही रे घटकाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने संविधान मजबूत होतं. लोकशाही वाचविले जाते.2014 पासुन असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस करिता राबत आहेत.कोणतीही अपेक्षा न ठेवता.2019 नंतर कॉग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (उबाठा) मविआसाठी कार्यकर्ते राबत आहेत कोणतीही अपेक्षा न ठेवता.आंबेडकरवादी/पुरोगामी/मुस्लिम/ख्रिश्चन,असंख्य सामाजिक चळवळी/संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते स्वखर्चाने,भाजपला रोखण्याकरिता प्रामाणिकपणे मविआ सोबत आहेत.केवळ सभेत वा पत्रकार परिषदेत आमच्या नावांचा जप वा उल्लेख करून आम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करू नये.
आम्ही आमची जबाबदारी पार पाडलीय आता तुम्ही कर्तव्यास तयार रहा.नाही तर लोकसभेचं वातावरण उलटं होण्यास वेळ लागणार नाही.सदासर्वकाळ मविआ सहकार्य करणाऱ्या घटकांना मविआ मूर्ख बनवू शकणार नाही. फक भावनिक करून मविआ या घटकांची मतंही आता घेऊ शकणार नाही.तुम्ही सतत सत्तेत राहयचं म्हणजे लोकशाही वाचते हे सुत्रं तुमच्या डोक्यात असेल तर ते काढून टाका.उपेक्षित, नाही रे घटकांना तुम्ही सत्तेत सामावून घेणार नसाल तर जी किंमत चुकवायची असेल ती चुकवायला आम्ही तयार आहोत.असंही मनुवादयां विरोद्धात आम्ही हजारो वर्षापासुन लढतच आहोत.लढत राहू,पण तुम्हाला अजिबात मदत करणार नाही. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात,आंबेडकरवादी/पुरोगामी/मुस्लिम-ख्रिश्चन आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकगठ्ठा मतदान तुम्हाला केलंय.त्यामुळे 31 सीट आल्यात.ठाकरे-पवारांना सहानूभूती होती म्हणून जिंकलो हा एकच पोकळ दावा करू नका.बाकीच्यांच्या कष्टाचं मोल करा.त्यांना विचारात घ्या.भितीचे बुजगावणे उद्धवस्त करण्याची ताकद वरील सर्व घटकात आहे फक्त एकत्र येण्याची गरज आहे
अॕड बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व रिपब्लिकन गटांना /पुरोगामी तसेच असंख्य सामाजिक संघटनांना/एकत्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा हि कळकळीची विनंती त्यांना या छोटया पोस्टद्वारे करतो.*मात्र,एकत्र आल्यावर सत्तेत जाता येईल असाच निर्णय घ्यावा.जो पर्यत सत्तेत जात नाही तोपर्यंत संविधान आणि लोकशाही सक्षम होणार नाही.
सबब, मी आणि माझ्या सोबतच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपला रोखण्यासाठी मविआला पूर्ण साथ दिलीय.मविआही पूर्णपणे सोबत होतीच त्यामुळे मी मविआवर नाराज नाही.वैयक्तिकही काही अडचण वा तक्रारही नाही.मात्र, समग्र समाजाच्या उत्थानाकरिता लोकशाही सदृढ होणं आवश्यक आहे.त्याकरिता माझ्या सारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांची ही भूमिका कायम राहिल.म्हणून सत्तेच्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नवीन आमदार-खासदार-नगरसेवक तुमच्या/मविआच्याच घरात जन्मावेत हे सुद्धा आम्हाला मान्य नाही.मविआ याचा गांभिर्याने विचार करेल याबाबत आशावादी आहे.
आपला हितचिंतक
—विशाल हिवाळे
(संविधान अभ्यासक आणि प्रचारक)
9022488113
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत