सूरजचा देशातील पहिल्या 25 प्रभावशाली तरुणांमध्ये समावेश
वरील चित्रातल्या तरुणांचे नाव आहे डॉ. सूरज एंगडे. नांदेड (जयभीम नगर) येथील पत्र्याच्या घरात त्याचे बालपण गेले. वडील बँकेत चपराशी होते. विद्यार्थी दशेत त्याने शेतीत रोजमजुरी केली, ट्रक वर हेल्पर म्हणून देखील काम केले.
या तरुणाचे वय् आहे अवघे 35 वर्षे, या वयात सूरजचा देशातील पहिल्या 25 प्रभावशाली तरुणांमध्ये समावेश झाला आहे. सूरजने आशिया, आफ्रिका, युरोप व उत्तर अमेरिका या चार खंडातून शिक्षण घेतले आहे. सुरजवर डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे व त्याने हॉवर्ड विद्यापीठात संशोधण केले आहे. सध्या तो अमेरिकेतील बोस्टनमधील हॉवर्ड या विद्यापीठात पोस्ट-डॉक फेलो म्हणून काम करतोय.
भारतातील आघाडीचा विचारवंत म्हणून सुरजची ख्याती आहे. आजमितीस त्याचे 100 पेक्षा जास्त लेख व पुस्तक समीक्षा विविध प्रिंट माध्यमातून प्रकाशित आहेत. 2019 ला सुरजला कॅनडा चा डॉक्टर आंबेडकर जस्टीस अवॉर्ड मिळालाय* इतकेच काय तर भारताचा साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठ्या साहित्य अकादमी या पुरस्कारासाठी त्याचे नामांकन झाले आहे. सूरज आफ्रिकेतील विद्यापीठातून पीएचडी मिळवणारा पहिला दलित तरुण आहे.
सूरज चे कास्ट मटर्स हे पुस्तक पेंगविन (Penguin) प्रकाशनाने प्रकाशित केलय व बेस्ट सेलर ठरलं आहे. या पुस्तकाच्या पहिल्यांदा छापलेल्या प्रती हातोहात विकल्या गेल्या व दुसर्यांदा हे पुस्तक आता प्रिंट होते आहे.
आजच्या तरुण पिढीने सूरज चा आदर्श ठेवावा….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत