निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

कोणी न्याय देता का न्याय?

ऍड. स्वप्निल नरेंद्र इनामदार.


आज 4 जुन 2024 रोजी लोकसभा निवडणूकीत उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी मध्ये पहिल्या वेळेस 2200 मतांनी अमोल कीर्तिकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्या विरोधात रविंद्र वायकरांनी रि कॉऊंटिंग साठी अर्ज केला. त्यांचा प्रथम अर्ज फेटाळण्यात आला. पण नंतर वरून फोन आल्या मुळे रि कॉऊंटिंग करण्यात आले.. त्यात 1785 मतांनी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. परंतु पुन्हा रि कॉऊंटिंग करण्यात येऊन 631 मतांनी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. पुन्हा रि कॉऊंटिंग मध्ये 1 मताने अमोल आघाडी वर असल्याचे सांगण्यात आले व सरते शेवटी पोस्टल बॅलेट च्या माध्यमातून 48 मतांनी रविंद्र वायकर यांना विजयी करण्यात आले…….
मित्रांनो विक्रम वेताळ च्या गोष्टी आठवतात का??? त्यामध्ये एक प्रसंग सांगितला जायचा व त्यामध्ये नेमकी चूक कोणाची व दोषी कोण हे वेताळ राजा विक्रमा दित्याला विचारायचा…. आता मित्रांनो या विक्रम वेताळ गोष्टी प्रमाणे अमोल कीर्तिकर यांना प्रथम विजयी आणी नंतर पराभूत ठरविण्या मागे नक्की चूक कोणाची आहे? किंवा दोषी नेमके कोण आहे ? निवडणूक आयोग की मतमोजणी करणारा कर्मचारी वर्ग की EVM मशीन बनवणारी कंपनी की हॅकर्स की पोस्टल बॅलेट पेपर संबधी दूरदृष्टी वापरून बदलले गेलेले नियम की या सगळ्यांना कारणी भूत असणारी, पुन्हा,पुन्हा आणी पुन्हा निवडून येण्या साठी, षडयंत्र रचणारी, पाताळ यंत्री भारतीय जनता पार्टी की हा सगळा खेळ निमूट पणे बघणारे, वरून आलेल्या फोन चे आदेश तंतोतंत पाळणारे आणी सगळे माहिती असून देखील जाणीव पूर्वक मौन बाळगणारे सरकारी कर्मचारी???
जनता रुपी जनार्दन आता हे सर्व प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारत आहे….
आणी जमल्यास लोकशाही राज्यात संविधानाने देऊ केलेल्या न्यायाची अपेक्षा बाळगत आहे……सर्व सामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमोल कीर्तिकरांना कोणी न्याय देता का न्याय?? असो… !
ऍड. स्वप्निल नरेंद्र इनामदार. गोरेगाव, मुंबई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!