आरोग्यविषयकमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

खर्दे बु. येथे औषधी वनस्पतीचे रोपे देऊन नवगतांचे केले स्वागत ….
तालुक्यातील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे येथे संस्थेचे आधारवड स्व. मुकेश भाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्व. मुकेशभाई पटेल यांच्या कार्याचा परिचय दिला. शैक्षणिक वर्ष 2024- 2025 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतीचे रोपे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी सखोल माहिती व्हावी यासाठी विद्यालयाने नवगतांना रोपे देऊन स्वागत केले. आपल्या घरी किंवा शालेय परिसरात सदर रोपाची लागवड करावी आणि त्याची वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच वृक्ष सजीवांसाठी किती आवश्यक आहे याविषयी माहिती विद्यालयातर्फे देण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा,खऱ्या अर्थाने आपले जीवन घडवा असा संदेश औषधी वनस्पतीचे रोपे वाटप करून देण्यात आला. आवळा, चिंच, पिंपळ, वड, बेल या रोपांचे वाटप विद्यालयात करण्यात आले.तसेच शाळेतील पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी खर्दे गावाचे सरपंच चंद्रकांत गुजर , उपसरपंच श्रीमती प्रमिलाबाई कोळी,पोलीस पाटील सुरेश सोनवणे,विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती जाधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी . व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, पी . एस.अटकाळे, बी. एस. बडगुजर,बी. एस. पावरा, श्रीमती एस .आर. निकम, श्रीमती मनीषा पाटील, डी.डी. जाधव, आदेश मालोदे तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!