महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

माणसाची अधोगती कशी होते

” मनुष्याच्या अध:पतनाची कारणे काय असतात हे सांगतांना तथागत म्हणतात की :-

“कोणाची उन्नती होत अाहे आणि कोण अधोगतिला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे.धम्मप्रेमी हा उन्नत पथावरील,तर धम्मव्देष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू असतो.जो धम्मावर प्रेम करतो त्याची उन्नती होते;जो घृणा करतो त्याचे पतन होते.”

“अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात.त्याची दुर्गुणी माणसांवर श्रध्दा असते त्यांचा धर्म त्याला चांगला वाटतो;हे त्याच्या अधोगतिचे दूसरे लक्षण होय.”

“झोपाळूपणा,गप्पा मारण्याची आवड,निरूद्योगीपणा,आळस,क्रोधविष्टता हे सर्व दुर्गुण असणे,हे अधोगतीचे तिसरे लक्षण होय.”

“त्यांचे आई-बाप वृध्द झाले व त्यांचे असतांना,जवळ संपत्ती असूनही मुलांनी त्यांचे पालनपोषण न करणे,हे अधोगतीचे चौथे लक्षण होय.”

“श्रमण किंवा अन्य उत्तम मार्ग दाखविणा-या शास्त्याला असत्य भाषणांनी ठकविणे,हे अधोगतीचे पाचवे लक्षण होय.”

“जवळ विपुल द्रव्य,सुवर्ण,धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे,हे अधोगतीचे सहावे लक्षण होय.”

“आपले कूळ,संपत्ती,जात यांचा अभिमान बाळगून आप्तेष्टांचा तिरस्कार करणे,हे अधोगतीचे सातवे लक्षण होय.”

“व्यभिचार,मद्यपान,जुगार आणि ऐषाराम यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे,हे अधोगतीचे आठवे लक्षण होय.”

“स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या,गणिका आणि परस्त्रिया यांच्याकडे जाणे,हे अधोगतीचे नववे लक्षण होय.”

“असंयमी,उधळी स्त्री अथवा पुरूष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे,हे अधोगतीचे दहावे लक्षण होय.”

“जवळची साधने अल्प असूनही उच्च कुळात जन्म झाला,या सबबीवर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे,हे अधोगतीचे अकरावे लक्षण होय.”
ही सर्व अधोगतीचे लक्षणे आहेत.
या सर्वांपासून दूर राहिल्याने मनुष्य सुरक्षित राहून चांगले जीवन व्यतीत करू शकतो.

“भवतु सब्ब मंगलम्”
“नमो बुध्दाय, जय भीम”
????????????????????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!