लोकसभा निकालांच्या आडून नीटचे निकाल जाहीर
डी. उषा
उघडा डोळे बघा नीट…
डॉक्टर होण्यासाठी देशाच्या पातळीवर परीक्षा घेतली जाते.
त्या परीक्षेला नीट म्हणतात.
लाखो विद्यार्थी देशभरात नीट देतात.
लोकसभा निकालांच्या आडून नीटचे निकाल जाहीर झाले.
निकालाने देशात हलकल्लोळ माजला.
काही कोर्टात धावले.
काही पोरांनी आत्महत्या केल्या.
६७ मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले.
आणि
त्यातील काही पोरांनी एकाच सेंटर वरून परीक्षा दिली होती.
हिंदी पिक्चरच्या वरताण योगायोग !!
माना मोडून अभ्यास करणाऱ्या मुलांच्या स्वप्नांना चूड लागली.
हुषार मुलं हताश ,निराश होणार यात शंका नाही.
डॉक्टर होणाऱ्या मुलांनाच डॉक्टरकडे न्यायची वेळ आलीय !
सीतेसारखी अग्नी परीक्षा
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागतेय.
हे नुकसान खूप लाँग टर्म आहे.
तळटीप :
एका मुलीला भौतिक शास्त्रात एक गुण मिळालाय.
ती मुलगी नीट मध्ये टॉपर आहे.
सखोल तळटीप :
अशा परीक्षा होत राहिल्या तर
भविष्यात दवाखानेच कत्तलखाने होतील !!
डी. उषा
????????????
लिंक कॉमेंट्स मध्ये
विकृतांचा_सुकाळ
सुमारांची_सद्दी
नीट_परीक्षा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत