बेकायदा बांधकामावर पालिकेची कारवाई असमाधानकारक – हायकोर्ट
मुंबईत गेल्या वर्षभरात ४८ हजारांच्या आसपास बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात आल्याचा आणि त्यातील २२ प्रकरणांत गुन्हा दाखल केल्याचा दावा महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात केला. मात्र, कारवाई करण्यात आलेल्या फलकांच्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संख्येतील तफावतीवर बोट ठेवून ही कारवाई समाधानकारक आहे का, असा उपरोधिक प्रश्न न्यायालयाने महापालिकेने केला. गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आलेल्या बेकायदा फलकांत १०,८३९ राजकीय, ४,५५१ व्यावसायिक आणि सुमारे ३२,४८१ बेकायदा फलकांचा समावेश आहे.
महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. तसेच, सद्यस्थितीला शहरात फेरफटका मारल्यास पदपथ, पथदिवे आणि झाडांवरही सर्रास बेकायदा फलकबाजी दिसून येईल, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने महापालिकेला सुनावले. त्यावर, महापालिका अधिकाऱ्यांकडून दरदिवशी पाहणी करून बेकायदा फलकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील अनिल साखरे आणि वकील केजाली मस्तकार यांनी केला. याशिवाय, वर्षभरात केलेल्या कारवाईपैकी ४१० बेकायदा फलकांबाबतचा अहवाल पोलिसांना पाठवण्यात आल्याचे आणि पोलिसांनी त्यातील २२ प्रकरणात गुन्हे नोंदवल्याचेही महापालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. परंतु, न्यायालयाने दाखल गुन्ह्यांच्या संख्येवरून पुन्हा नाराजी व्यक्त केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत