कल्याण मध्ये बौद्धांचे सामाजिक ऐक्य—– तरुणांचा एक प्रयत्न, प्रयोग
डॉ. रविंद्र जाधव, समाजसेवक
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात असंख्य बौद्ध बांधव मोठया संख्येने राहतात. परंतु ते एकसंघ नाहीत. त्यांना एक संघ करण्याचा प्रयत्न समाजसेवक डॉ. रविंद्र जाधव आणि त्यांचे संविधानाचे सैनिक करणार आ
मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर बौद्धांचे उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही संविधानाचे सैनिक ( बौद्ध समाज विंग ) या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉ. रविंद्र जाधव यांच्या संकल्पनेनुसार कल्याणमध्ये सामाजिक ऐक्य परिषद आयोजित करीत आहोत.
या सामाजिक ऐक्य परिषदेचे एकच लक्ष आहे की ,
1) कल्याण शहरातील सर्व बौद्धांचे एकमेव मोठे सामाजिक संघटन उभे करणे.
2) त्यांची एक नवीन अराजकीय सामाजिक संघटन शक्ती उभी करणे.
3) ही कल्याण मध्ये निर्माण होणारी बौद्ध समाजाची सामाजिक ऐक्य परिषद आपापल्या प्रभागात कोणाला निवडून द्यायचे हे ठरवेल. किंवा समाजाने एखाद्या विषयावर कोणती भूमिका घ्यावी हे ठरवेल.
4) KDMC च्या प्रत्येक प्रभागात सामाजिक ऐक्य परिषदेच्या शाखा उभ्या राहतील.
5) या शाखाच्या माध्यमातून ही परिषद बौद्धांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय सर्वेक्षण करेल.डाटा कलेक्शन करेल.
6) ही सामाजिक ऐक्य परिषद बौद्धांच्या सर्वांगीण विकासाचे कोणकोणते उपक्रम राबविणे आवश्यक आहेत. हे मार्गदर्शन करेल.
7) ही सामाजिक ऐक्य परिषद बौद्धांची लोकशाहीवादी सामाजिक संघटन शक्ती म्हणून उभी राहील.
8) ही सामाजिक ऐक्य परिषद अराजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची असेल. ( राजकारणात नसलेले ) यात बौद्धांतील साहित्यिक, पत्रकार, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग असावा किंवा मित्रांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे.
9) विद्वान मित्रांच्या योग्य मार्गदर्शनाखाली समाजासाठी योग्य भूमिका घेण्यात येईल. ज्यातून समाज एकसंघ राहील.
10) ही परिषद बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नव नवे उपक्रम राबविल.
11) असे कल्याण मधील बौद्ध तरुण जे कोणत्याही राजकीय चळवळीत नाहीत . ज्यांचे एकच लक्ष आहे की बौद्ध म्हणून एकसंघ रहायचे आणि तरुणांसाठी चांगले भविष्य निर्माण करायचे , असे सर्वसमावेशक संविधानात्मक भूमिका घेणाऱ्या तरुणांनी खालील व्हाट्सअप मो. 9833155731वर आपले विचार मांडावेत आणि सदस्य म्हणून नांव नोंदवावे. फीज घेतली जाणार नाही.
12) त्यातून ठरवता येईल की खरोखरच कल्याण मधील जागरूक बौद्ध तरुण अशा बलशाली सामाजिक ऐक्यासाठी इच्छुक आहेत का ? जर असतील तर मग काही मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लवकरच एक बैठक आयोजित करू…
13) आता बौद्ध तरुण जागरुक झाले आहेत . कोणीही उठून आमच्या समाजाचे नेते पद जाहीर करू शकत नाही तर समाजाला ठरवू द्या , की आपला नेता कोण असावा. एखादा स्वयंघोषित नेता चुकीचा निर्णय घेऊन संपूर्ण समाजाला फरफटत नेऊ शकतो. व आपल्यावर फस्तावण्याची वेळ येऊ शकते. हे कुठेतरी रोखले गेले पाहिजे असे आम्ही ठरविले आहे.
14) चला तर एक होऊ… नेक होऊ… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसा आपल्या हाती घेऊ.
डॉ. रविंद्र जाधव, समाजसेवक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत