निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पुरोगाम्यांच्या जबाबदाऱ्या अजून संपलेल्या नाहीत ,,,, अजून बराच लांब चां पल्ला गाठायचा आहे ,,,,,!

ऍड अविनाश टी काले अकलूज 
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर 
मो न :- 9960178213

निवडणुकीचे निकाल लागले , यात इंडिया आघाडी सत्ता स्थापनेच्या स्थितीत नाही .
आणि एन डी ए सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या संख्या बळा पेक्षा अधिक मोठी आहे .
पण तरीही स्व बळावर सत्ता स्थापन करेल या स्थितीत भाजपा राहिलेला नाही ,
समाज वादी पक्षाने अशी जोरात मुसंडी मारली की भाजपा चां विजय रथ उत्तर प्रदेशात अडकून राहिला
खुद्द अयोध्येत झालेला भाजप चां पराभव त्यांच्या खूप जिव्हारी लागलेला आहे .
ज्या राहुल जी गांधी यांना पप्पू म्हणून मीडियाने आणि भाजपच्या परिवाराने हिणवले , टिंगल टवाळी करून त्यांचे मानसिक बल उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून दर्शवून दिले की मेहनत करण्यात ते कुठेही कमी नाहीत , आणि बुध्दी चातूर्यात ही नाहीत , “भारत जोडो ,, आणि मणिपूर ते मुंबई “सामाजिक न्याय यात्रा” यातून त्यांनी थेट जनतेशी साधलेला संवाद ,
तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात 84वर्षाच्या शरद पवार नावाच्या वादळाने केलेली कमाल , आणि उध्दव जी ठाकरे ते संजय राऊत सुषमा अंधारे , शरद कोळी , यांच्या सारखे आक्रमक वक्ते यांनी शिवसैनिकात ओतलेली जान आणि आत्म स्वाभिमानाचे पेटवलेली मशाल याने धमाल उडवून दिली .
याचा परिणाम म्हणून मध्यप्रदेश वगळता भाजपचा ग्राफ अतिशय खाली आला .
तरीही सिंगल लार्जेश्ट पार्टी म्हणून राष्ट्रपती त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतील , आणि सत्ता स्थापनेचा जुगाड त्यांना करावा लागेल असे चित्र आज दिल्लीत आहे .
एन डी ए मधील घटक पक्षांनी सुरू केलेले दबाव नीतीचे राजकारण यातून हे घडत आहे .
मी जिथे राहतो तेथून दिल्ली खूप लांब आहे , तरी ही इंडिया आघाडी तील मुख्य घटक पक्षातील नेत्यांचा थेट सबंध माझा आहे .
आणि याच आधारे मी आपणास आश्र्वस्थ करत आहे की
“आयेगा तो मोदी जी ही” अश्या कवी कल्पना कितीही आणि कुणी ही केलेल्या असल्या तरी ही
हे सरकार इंडिया आघाडीचे च बनेल ,, त्या साठी तुम्हाला 15जून ते 20जून दरम्यानची वाट पहावी लागेल .
आणि ही बाब वाचकांनी अधो रेखित करून ठेवावी ,,
मी हवेत गप्पा मारत नाही , आणि तो माझा स्वभाव नाही ,,,,
असो
आपला मूळ मुद्दा हा आहे की आमच्या सारख्या च्या जबाबदाऱ्या अधिक वाढलेल्या आहेत .
मी पूर्वी वाचलेले आहे की कांहीं दशका पूर्वी काँग्रेस ची चिंतन शिबिरे पार पाडली जात , आणि अश्या शिबिरात खुल्या चर्चा होत असत .
पण ही प्रक्रिया पुढे बंद पडली , आणि सत्ता स्थापनेचा मार्ग सहकार संस्थानिक , आणि निम सरंजाम जहागीर दारांच्या वाड्याच्या आतून जाऊ लागला .
माणसांचे गठ्ठे विचारावर पोसण्याच्या ऐवजी संपत्ती आधारे निर्माण झाले , आणि याला छेद दिला तो संघाने निर्माण केलेल्या हिंदू राष्ट्र वादाच्या विचारसरणी ने ,,,
आपले पक्षीय बळ वाढवले ,,,
धर्म हा माणसांना बांधून ठेवतो , हे वास्तव आहे , तर दुसऱ्या बाजूने धर्मातील सामाजिक जात रचने मुळे निर्माण झालेली सामाजिक , आर्थिक , राजकीय , शैक्षणिक विषमता ही माणसांना विकासापासून रोखून धरते ,
भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून या उपेक्षित वर्गासाठी संरक्षण देण्यात आले , नागरिक म्हणून समान दर्जा प्राप्त झाला , त्यांचे साठी राजकीय शैक्षणिक नौकरी यातील आरक्षण आले , आणि ही बाब फक्त एस सी एस टी वर्ग समुहासाठी घडली नाही तर समाजातील हजारो चे संख्यात असलेल्या ओबीसी जाती समूहासाठी 340व्या कलमने लागू झाली ,
हा लेख लिहित असतानाच मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शब्बीर भाई अहमद अन्सारी यांनी लिहिलेले
“मंडल नामा” नावाचे पुस्तक माझ्या कडे आले , आणि अधाश्या सारखे ते मी वाचून काढले ,
धर्म विरहित क्लास ( व्यवसाय आधारित जाती समूह ) हे मुस्लिम समाजात ही आहेत म्हणून त्यांनी केलेली चळवळ इतकी प्रभावी आहे , की एक माणूस प्रामाणिक असेल आणि समाजासाठी समर्पित असेल तर काय घडवू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे ,
महान अभिनेता दिलीप कुमार जी यांनी त्यांना “मुजाहेद” (समाजा साठी पूर्ण आयुष्य समर्पित करणारी व्यक्ती)अशी उपाधी देणे , आणि एका संघटने साठी काँग्रेस पक्षाने विधान सभेला 5 जागा देणे यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते .
अर्थात या पुस्तकावर उद्या सविस्तर लिहीन .
पण ज्या आरक्षणाला भाजप सारख्या पक्षाने सार्वत्रिक विरोध केला ,
त्याच पक्षा चे खोट्या मुखवट्या ला बळी पडून आपण आपल्या भावी पिढ्यांचे किती मोठे नुकसान करत आहोत ? याची किंचित ही कल्पना एस सी , एस टी , एन टी , ओबीसी वर्गातील जनतेला नाही .
या सामाजिक विषमता आणि जातीय व धार्मिक विद्वेष याचे आधारे हिंदू राष्ट्र निर्मिती चे प्रयास हे अंतिमतः भारतीय राज्य घटनेच्या विरोधातील प्रत्येक पाऊल असणार आहे ,
या देशातील लढाई ही वैदिक समाज विरुद्ध अवैदिक समाज असाच लढा आहे , आणि छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू फुले आंबेडकर वाद हाच एक वैचारिक पाया या प्रबोधनाचा आहे , व तो घेऊनच समग्र समाजाचे प्रबोधन करणारी फळी निर्माण करावी लागेल , आणि त्या नंतर स्थायी सत्ता स्थापनेत या सर्व समाज घटकाचे प्रतिनिधित्व ही निच्छित करावे लागेल ,
कोणताही वाटा हा उपकार म्हणून नाही तर भागीदार म्हणून द्यावा लागेल , ही बाब रीसिप्रोकल असते ,
व ती त्या पक्षाची ही जबाबदारी असते .
वर्ण , वर्ग , स्त्री दास्यांतक लढा उभारताना आत्ता स्थानिक पातळीवरील अर्ध सामंती शक्ती चे विरोधात लढाई करून त्यांना वैदिक संस्कृती व शासन व्यवस्थेचे वाहक बनवणे टाळले पाहिजे ,
राष्ट्रीय स्तरावर विकसित झालेल्या भांडवलदारी शक्ती पुढे त्यांची शक्ती नगण्य आहे हे आपण पाहिलेले आहे
भाजपा सारख्या पक्षाने भांडवलदारी शक्ती शी समझोता करून सत्ता स्थापित केल्या नंतर अश्या शक्ती ना केंद्रीय यंत्रणेचा वापर करून गुडघ्यावर उभे केलेले पाहिले आहे .
म्हणून या शक्ती ला पुरोगामी विचाराचे वाहक बनवणे आपल्या अंतिम हिताचे आहे , पण हे करत असताना , सत्तेतील आपला वाटा ही आपल्यातील मूर्ख व्यक्ती ला सत्ताधारी बनवून समग्र समाजाचे नुकसान ही केले जाऊ नये म्हणून सामाजिक प्रबोधन करून या वर्गीय सत्तेवर आपला नैतिक दबाव ही असणे आवश्यक आहे असे मला वाटते ,,,
तूर्त इतकेच ,,,,,,!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!