तथागत बुद्धांनी मानवाच्या पराभवाची सांगितलेली बारा कारणे…
????1) तथागत म्हणाले, ज्याची उन्नती होते अशा पुरुषाची ओळख सहज होते. उन्नती करणारा पुरुष हा धम्माचे आचरण करणारा असतो आणि ज्याची अवनती होते तो धम्माचा द्वेष करणारा असतो,त्यामुळे त्याची अधोगती होते कारण त्याचे आचरण शुद्ध नसते. तो कायेने, वाचेने आणि मनाने पापकर्म करीत असतो हे त्याच्या अधोगतीचे कारण आहे.
????2) ज्या माणसाला सज्जनाची संगत आवडत नाही, जो नेहमी दुर्जनाच्या संगतीत राहतो. खूनी,व्यभिचारी माणसं नेहमी वाईट कर्मे करीत असतात. त्यामुळे त्यांच्या संगतीत राहणारा माणूस त्यांच्या प्रमाणेच वाईट कर्मे करतो, त्यामुळे त्याची अधोगती होते.
????3) जी व्यक्ती सतत झोपून राहते, कष्ट करीत नाही. जी व्यक्ती आळशी आहे,आणि क्रोधी आहे. अशा माणसाची अधोगती होते. आळशी आणि क्रोधी माणसे कधीही सुखी होत नाहीत,त्यांची अधोगती होते. त्यांचे धन घटत राहते.
????4) जो समर्थ असून वृद्ध आई-वडिलांची सेवा करीत नाही,त्यांचे पालन पोषण करीत नाही अशा माणसाची अधोगती होते.
????5) जो श्रमणाला किंवा इतर गरीबांना खोटे बोलून फसवतो कारण खोटे बोलणे हे वाचेचे पाप आहे. एक खोटे लपविण्यासाठी त्याला दुसऱ्यांदा खोटे बोलावे लागते अशाप्रकारे पुन्हा पुन्हा खोटे बोलतो आणि वाचेने पाप कर्म करतो. त्याचेवर कोणी विश्वास ठेवत नाहीत,त्याला मदत करित नाहीत. त्यामुळे त्याची अधोगती होते.
????6) ज्या माणसाकडे भरपूर धनदौलत आहे,अन्नधान्ये आहे,तो श्रीमंत आहे,परंतु कोणालाही मदत करीत नाही. श्रमण,गरीब जो अन्नावाचून उपाशी मरत आहे. मात्र या अन्नधान्याने संपन्न असणाऱ्या माणसाला दया, माया येत नाही अशा माणसाची अधोगती होते. कारण त्याच्याबद्दल कोणाला आदर वाटत नाही. त्याच्याबद्दल सर्वांच्या मनात चीड येत असते. संकट समयी त्याला कोणी मदत करीत नाहीत म्हणून तो लुटला जातो,
संकटात सापडतो व त्याची अधोगती होते.
????7) ज्या माणसाला जातीचा, धनाचा, गोत्राचा गर्व आहे, जो दुसऱ्यांचा आदर करीत नाही,अपमान करतो अशाची अधोगती होते. त्याचा पराभव होतो. म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारचा गर्व ठेवू नये.
????8) जो मनुष्य व्यभिचारी आहे, व्यसनी आहे. असा मनुष्य हा नेहमी अशा व्यसनामुळे संपत्तीचा नाश करतो. त्यामुळे त्याचा पराभव अटळ असतो.
त्याची अधोगती होते. दारु, जुगार, व्यभिचार ही अधोगतीची कारणे आहेत. म्हणून प्रत्येक माणसाने व्यसनांपासून दूर रहावे.
????9) जो मनुष्य पत्नीपासून संतुष्ट राहत नाही. परस्त्री-गमन संबंध ठेवतो, अशा माणसाची अधोगती होते. त्यामुळे त्याची निंदाही होते. त्याला वेगवेगळे आजार जडतात,धन संपत्तीचा नाश होतो आणि वाईट स्थितीत त्याचा अंत होतो.
हे त्याच्या पराभवाचे अधोगतीचे कारण आहे.
????10) जो वयस्कर आहे, परंतु तरुण मुलीबरोबर लग्न करतो. तिच्या इच्छेप्रमाणे राहत नाही. तिच्या चिंतेने जळत राहतो,
तिच्याकडे संशयाने पाहतो,मारझोड करतो, त्यामुळे घरात कलह वाढतो आणि त्याची अधोगती होते. त्याचा संसार रसातळाला जातो,त्याचा पराभव होतो.
यासाठीच तथागत म्हणतात,’सदाचारी राहा, शीलवान व्हा त्यामुळे आपली अधोगती होणार नाही’.
????11) जो मनुष्य लोभी आहे, उधळ्या आहे. अशा स्त्री किंवा पुरुषाला अधिकाऱ्याच्या जागेवर बसवले, तर अशा माणसांचा पराभव व अधोगती होते. कारण तो काटकसरी नसतो. त्यामुळे नेहमी त्याची अधोगती होते. नाश होतो, पराभव होतो म्हणून पती-पत्नी मुलगा-मुलगी,सर्वजण धनाची जाणीव ठेवणारे असले पाहिजेत. धन जपणारा असला तरच तो सुखी होतो आणि त्याची अधोगती होत नाही. त्याचा संसार सुखाचा होतो.
????12) एखादा मनुष्य क्षत्रिय आहे त्याला आपल्या कुळाचा गर्व आहे. अशा माणसांचा पराभव होतो. कारण क्षत्रिय आहे,परंतु मनुष्य बळ नाही,धन नाही,कुळाच्या गर्वात राहतो, त्यामुळे त्याचा पराभव होतो. त्याची अधोगती होते. जातीच्या कुळाच्या नावावर कोणीही सुखी होत नाही. त्यासाठी मेहनत प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच सुख प्राप्त होते.
या बारा कारणाने मनुष्य सुखी होत नाही, तर तो नेहमी मानसिक दडपणाखाली जगतो, त्याचे मन शांत नसते त्यामुळे तो दुःखी होतो.
मानवाच्या अधोगतीची हिच कारणे आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत