मनुस्मृतीचे कवित्व ,,, आणि जितेंद्र आव्हाड यांचे उतावळे आंदोलन ,,,,!

ऍड अविनाश टी काले . अकलूज
तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो नंबर :- 9960178213
विद्यमान महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती चे कांहीं धडे समाविष्ट केले आणि समग्र महाराष्ट्रातून याचा निषेध अनेक पुरोगामी चळवळी व भाजपा विरोधी पक्षांनी सुरू केला .
मी कांहीं वर्षापूर्वी आमच्या घरात आर्य समाज चळवळीतून मनू स्मृती वरील हिंदी भाषांतर वाचले होते .
तत्कालीन राज्य व्यवस्था , त्याची कर पध्दती , सैन्य रचना , गुप्तचर यंत्रणा , अस त्यात बराच मोठा भाग होता , आणि रंजक इतिहास म्हणून मी त्याचे मराठी भाषांतर ही केले होते , ती टिपणे अनेक वर्ष तशीच पडून राहिली ,
तत्कालीन समाज व्यवस्था या प्रगत नव्हत्या आणि अगदी युरोप खंडात ही माणसांना गुलाम बनवून त्यांच्या खरेदी विक्री चालत , रोमन काळात याचा मोठा व्यवसाय चालत असे ,
अमेरिका सारख्या आजच्या प्रगत राष्ट्रात वर्ण भेद किती कडक होता आणि वर्ण द्वेष ही किती भयानक होता या संबंधाने
सौ स्मिता गव्हाण कर यांची एक पुस्तिका होती “एक होता कार्व्हर”
भुईमुगाच्या शेंगा वर संशोधन करणारा कार्व्हर हा निग्रो होता , आणि तो लहान असताना त्याच्या वडिलांना गोऱ्या चे टोळीने जीव मारले , आणि आई ला फरफटत ओढून नेऊन गुलाम बनवले
समाजात दृष्ट ही असतात आणि सृष्ट ही असतात , कार्व्हर हे व्हाईट मधील आडनाव , त्या भल्या माणसाने कार्व्हर हे स्वतः चे नाव दिले , त्याला शिक्षण दिले , आणि शास्त्रज्ञ बनवले
अमेरिकन प्रेसिडेंट ने असे जगाला 10ते 12 कार्व्हर भेटले तर ते पृथ्वीचे नंदनवन करतील असे सांगितले”
या कार्व्हर ने लहान असताना निग्रो वंशाच्या लोकांना जिवंत जालताना पाहिले होते .
हे मी इथे का सांगत आहे ? तर इतिहासातील दुष्कृत्य सांगून अनेकदा युवकांची समाजाची माथी भडकावली जातात .
मनुस्मृती सदोष आहे का? होय ती नक्कीच तशी आहे ,, पण आजच्या
काळात तिचे उपयोग मूल्य शून्य आणि मृतवत झालेले आहे
पृथ्वीवरील समाज हा अती प्रगत झालेला आहे , आणि यात हिंदू समाज ही पिछाडी वर नाही .
जाती वर्ण स्त्री दास्य घडवून आणणारे कायदे याला कोण जुमानणार?
वर्ण व्यवस्थेतील सर्वोच्च पदी असणारा ब्राम्हण वर्ण आणि त्यांचे आजचे नायकत्व ज्यांच्या कडे आहे ते देवेंद्र जी फडणवीस यांच्या पत्नी ही मुक्तपणे रिल्स बनवताना दिसतात .
हे परिवर्तन झालेले आहे त्याला नाकारून चालत नाही .
पूर्वी अस्तित्वात असलेली सती ची चाल , महिलांचे केशवपन, बाल विवाह , बहु पत्नित्व हे काळाच्या ओघात नष्ट झाले , उरले सुरले जे ही असेल ते व जे मानवतेच्या विरोधात आहे ते घटना बाह्य ठरवले गेले ,
या पुरातन मनुस्मृतीचे पुनर्जीवन करायचे म्हणले तरी ते केवळ अश्यक्यप्राय आहे .
सांस्कृतिक अजेंडा म्हणून उद्योग व्यवसायात जाती व्यवस्था आधारित कौशल्य ला , ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजून विश्वकर्मा सारख्या कांहीं योजनांना गती देण्याचा प्रयत्न भाजप ने केला ,
आणि मनू चे उद्दत्ती करण व्हावे म्हणून कांहीं श्लोका चां समावेश आधुनिक शैक्षणिक अभ्यासक्रमात केला त्याचा विरोध हा झालाच पाहिजे .
परंतु हे आंदोलन करताना व आंदोलना साठी पर्याप्त वेळ असताना त्याचे उत्तम नियोजन ही केले गेले पाहिजे .
तसे आ जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचे दिसत नाही .
आपण फार पुरोगामी आणि आक्रमक आहोत असे दर्शवण्याची त्यांना प्रचंड घाई असते .
प्रथम आंदोलन करण्याचे क्रेडिट घ्येण्यासाठी प्रचंड स्पर्धा करणारा हा माणूस आहे .
आणि मी हे स्वानुभवातून सांगत आहे .
साधारण वर्ष भरा पूर्वी , एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस असताना , मी व माझे सहकारी मित्र आनंद पवार , ( राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया राज्य सचिव अजित दादा गट) मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यातील “कळवा ” येथे गेलो होतो , आमचे भटके विमुक्त चळवळीचे नेते तुकाराम जी माने साहेब यांनी समग्र बहुजनांच्या आर्थिक सामाजिक चळवळीला गती देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक वसाहत निर्मितीचा संकल्प केला होता ,
याच दरम्यान बहुजनांचे वैचारिक प्रबोधन व्हावे , आणि “हा जयद्रथ हा सूर्य”असे म्हणून आम्ही ज्याची वैचारिक मांडणी करणार त्याच्या पुष्ट्यर्थ खातरजमा करण्यासाठी सोबतीला पुस्तके , त्यातील उतारे व त्यावर काचा ठेऊन मांडलेले प्रदर्शन अशी संकल्पना घेऊन कांहीं रिटायर्ड मंत्रालयातील अधिकारी वर्ग असे मिळून सुनील जी तटकरे साहेब यांना जाऊन भेटलो .
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे ऑफिस मध्ये , सर्व तत्कालीन नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रोजेक्ट सादर करू म्हणून सांगितले .
ठाणेत येऊन ही आ जितेंद्र आव्हाड यांना भेट घेतली नाही असे होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो , पण
या माणसा कडे आदरातिथ्य नावाचा मागमूस ही दिसला नाही ,
तरी ही आम्ही या कडे दुर्लक्ष करून आमची कल्पना सांगितली .
दुसरे दिवशी आमचा ग्रुप पुणे , सातारा , मुंबई , नाशिक , सांगली अश्या विभागातून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस चे ऑफिस मध्ये आला .
सुनील जी तटकरे साहेब यांनी त्यांचे उत्तरदायित्व पाळून आम्हाला मांडण्याची संधी दिली .
दुर्दैवाने घाई गडबडीत आलेल्या अधिकाऱ्याने औद्योगिक वसाहत निर्मिती साठी 300एकर जमीन खरेदी करत असल्याचे सांगितले .जो भाग आमच्या चर्चेचा नव्हताच .
अजित दादा ही अवाक् झाले .
आदरणीय जयंत जी पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या संघटनात्मक पाठबळ देण्याचे ही कबूल केले ,
पण आर्थिक पाठबळ , गाड्या , इतर बाबी याच्या खर्चा चां मुद्दा तसाच राहून गेला ,
आम्ही मुंबई सोडली आणि रेल्वेत असतानाच जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी हे प्रबोधन यात्रा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले .
याचा सरळ अर्थ होता की कल्पना कुणाच्या ही असोत , प्रामाणिक माणूस त्याचे श्रेय त्यांनाच देतो , आणि नवीन कार्यकर्ते आपल्या चळवळीला जोडले जात आहेत याचा अभिमान बाळगतो .
पण इथे असे घडले नाही ,
पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षात ही अश्या नौटंकी करणाऱ्यांचे च फावते हा आमचा अनुभव आहे ,
असो
पण हे आंदोलन करत असताना त्यांनी गंभीर चूक केली ,
महाड येथे 25डिसेंबर 1925साली ज्या मनुस्मृतीचे दहन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले , त्याची स्मृती कायम रहावी व या निडर आंदोलनाचे स्पिरीट जागते ठेवावे म्हणून मनुस्मृती दहन करतानाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैल चित्र असलेल्या फोटो कॉपी फाडण्याचा अक्ष्यम्य असा अपराध जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे
ते मनुस्मृती चां निषेध करण्यासाठी चालले होते , आणि दुर्दैवाने त्यांची कृती असा निषेध ज्यांनी केला त्यांचा निषेध करण्याच्या कृतीत तब्दील झाला ,
हे अपघाताने घडले , हे मान्य करून सुद्धा , घाई गडबडीत सतर्क ता बाजूला ठेऊन केलेल्या कृतीचे हे फळ आहे ,
याचा व्हिडिओ आमच्या मित्राने जे आज अजित दादा यांच्या पक्षात आहेत त्यांनी माझ्या कडे लगेच पाठवला आणि त्या खाली टीपंन्नी ही लिहिण्यास ते विसरले नाहीत
” मला माहित आहे तुम्ही त्यावर अवाक्षर ही काढणार नाही”
माझ्या तरुण मित्राला मी सांगू इच्छितो की
महाभारतात द्रोणाचार्य यांना प्रश्न विचारला की कौरवांची बाजू चुकीची व पांडवाची बाजू सत्य असताना ही तुम्ही कौरवांच्या बाजूने का लढत आहात ?
द्रोणाचार्य यांनी उत्तर दिले ” मी कौरवांचे मीठ खाल्ले आहे , आणि मिठाला जागणे माझा धर्म आहे”
मित्रा वयाच्या 60 (साठीत) मी पोहचलो आहे , आणि कोणत्याच राज्यकर्त्यांच्या मिठात मी मिंधा झालेलो नाही ,
आम्ही खाल्लेली भाकरी आणि मीठ ही आमच्या कष्टाचे आहे , आमचा स्वाभिमान , आणि कष्ट करून जगण्याची संधी ही आमच्या बापाने म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे ,
कुणीही भडकवल की भडकून उठावे इतके कच्चे आणि अपरिपक्व आम्ही ही राहिलेलो नाही आणि चळवळ ही तशी राहिलेली नाही , आमचे शत्रू आम्हाला ज्ञात आहेत आणि मित्र ही ज्ञात आहेत .
आ जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करताना आम्ही कचरायचे कारण नाही तो जाहीर रित्या करत आहोतच पण या मुळे तुमचे चरण चुंबन ही आम्ही घेणार नाही ,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत