शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक कशासाठी ?

नूरजहाँ फक्रृरूद्दीन शेख
शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यासाठी अनेक विषय आहेत मनुस्मृतीमधील श्लोकच का ?असा प्रश्न निर्माण होत आहे.भाषा विषयांच्या विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा. तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते पंचवीस मनाचे श्लोक,सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवत गीतेतील बारावा अध्याय पाठांतराची स्पर्धा आयोजित करावी विज्ञान, गणितात ही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करावा.असा प्रस्ताव करण्यात आला आहे .
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्म ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांनी मनुस्मृती हा प्राचीन ग्रंथ दहन करणेच योग्य वाटले.या मागे कारण ही तसेच होते ज्या ग्रंथात माणसाला माणूस म्हणून जगण्याची मान्यता नाही. विषमतेची दरी निर्माण करणारा स्त्रियांनी लहानपणी पित्याच्या तारुण्यात पतीच्या म्हातारपणात मुलाच्या आज्ञेतच रहावे व गुलामगिरीतच जगावे,स्त्रियांना तुच्छ लेखणाऱ्या , स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंदी घालणाऱ्या या ग्रन्थाच्या विचारसरणीचा भारतातीलच नाही तर अख्ख्या जगातील स्त्रीला या आधुनिक युगात तिरस्कारच वाटेल.
जगातील इतर देश महासत्तेकडे वाटचाल करीत असताना पुन्हा अधोगतीच्या मार्गाने जाने अनुचित वाटते. शालेय अभ्यास क्रमात खरे तर तांत्रिक,वैज्ञानिक,टेकनिकल, वैद्यकीय शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला तरच पुढील पिढी आदर्श घडेल व भारत देशाचे नांव प्रगत देश म्हणून जगात उल्लेख होईल.
मनुस्मृती जी एक विषमतेची दरी निर्माण करते त्या ग्रंथातील काही श्लोक अभ्यासक्रमात घेणे म्हणजे आणखी विषमतेला खतपाणी घालणे,समता,बंधुभाव नष्ट करणे,धर्मांधता वाढविणे नाही का ? देशात अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत.सर्वांच्या धार्मिक रूढी परंपरा वेगवेगवळ्या आहेत परंतु सर्वांना समतेच्या एकात्मतेच्या बंधनात बांधणारा एकमेव ग्रंथ संविधान आहे. प्रत्येकाने संविधानाची मूल्ये जपलीच पाहिजेत यातच देशाचे हित समावले आहे.
प्रगत देशाचे शास्त्रज्ञ आता चंद्रावर गेले आहे तरी आपन आपल्या श्लोकाच्या विळख्यात अडकून पडलो आहे.जोपर्यंत हि विचारसरणी बदलत नाही तो पर्यंत आपल्या देशाचा विकास व प्रगती होणार नाही.शालेय जीवनात मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण द्या. जेणेकरून ते त्याच्या भविष्यत उपयोगी पडेल.त्यापासून तो स्वतःचा भक्कम पाया उभा राहिल.हे श्लोक पाठांतर करून ना त्याचे पोट भरणार आहे ना त्याचे भविष्य घडणार आहे.शासनाने मुलांना शिक्षण असे द्यावे की शिक्षण पुर्ण झाल्यावर तो स्वतः स्वावलंबी झाला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मना मनात तंत्रज्ञान, विज्ञान रुजले पाहिजे.धर्म ज्ञान ज्यांना घ्यायचे आहे त्यांच्यासाठी धर्मशाळाची दारे खुली आहेतच. मग सर्वांसाठी सक्ती कशाला करायची आहे ?
नूरजहाँ फक्रृरूद्दीन शेख
गणेशगांव
ता.माळशिरस जि.सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत