दिनविशेष – शुक्रवार दिनांक 31 मे 2024

आज दि. ३१ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सुक्कवारो, वेसाख मासो, शुक्रवार, वैशाख माहे.
३१ मे १९२० – रोजी नागपूर येथे भारतीय बहिष्कृत वर्गाच्या परिषद अधिवेशनाचा दुसरा दिवस.
*३१ मे १७२५ – अहिल्याबाई होळकर जयंती.*
३१ मे १९३१ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम वडनेर तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे युवकांना संदेश दिला की, “प्रत्येक गावात निर्भय तरुणांच्या संघटना स्थापन करून, लाठी चालविणे, व्यायाम करणे, शारीरिक खेळ शिकणे, वृत्तपत्र वाचणे आणि अज्ञानी लोकांना परिस्थितीबद्दल माहिती देणे यामुळे काम अधिक व्यापक बनते. मग आपल्या लढाईत यशस्वी होणे कठीण होणार नाही. खडतर परिस्थितीशी झगडुंनच समाजोन्नती शक्य आहे.”
३१ मे १९३६ – रोजी पुरंदरे स्टेडियम दादर, मुंबई येथे हैद्राबादचे बी. एस. व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल मुंबई प्रांत महार परिषदेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मुक्ती कौन (कोण) पथे” हे प्रसिद्ध भाषण केले.
३१ मे १९५२ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठाची एल. एल. डी. पदवी स्वीकारण्यासाठी जाणार असल्याने त्यांचे चाहते, अनुयायी, मित्र आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सत्कार जेवण प्रसंगी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत