पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांचा इतिहास प्रत्येक घरा घरात पोहचला पाहिजे : – विनायक

नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी आहिल्यामाईची जयंती साजरी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक हिंदु मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या तसेच तळागाळातील समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोहचला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आजच्या पिढीला अहिल्यादेवींचा इतिहास समजणार आहे असे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना म्हटले.
दि.३० मे रोजी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवाय बसस्थानकात आहिल्या माईच्या प्रतिमा पुजन माजी नगरसेवक विनायक अहंकारी, बलदेवसिंग ठाकुर, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी व भगवंत सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे सल्लागार ज्ञानेश्वर घोडके यांनी केले होते. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर घोडके, मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे सुहास येडगे, पत्रकार दादासाहेब बनसोडे , प्रभाकर घोडके, विलास येडगे, दीपक घोडके एकनाथ शिरगुरे, सुनिल गव्हाणे, उत्तम बनजगोळे, बंडप्पा कसेकर, रवी ठाकुर,राजेंद्र ठाकुर आदीजन उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विनायक अहंकारी यांनी म्हटले की अहिल्यादेवींचे कार्य महान असुन भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. समाजातील सर्व घटकांसाठी अहिल्यादेवींनी काम केले आहे. म्हणुनच त्यांना राजमाता, लोकमाता म्हणुन गौरविले जाते असेही विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ज्ञानेश्वर घोडके यांनी मानले.
यावेळी नळदुर्ग बसस्थानक तसेच नगरपालिका कार्यालयातही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. बसस्थानकात भाजपचे भिमाशंकर बताले यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत