महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

राजकीय अजेंडासाठी भाजपवाल्यांनी बाबासाहेबांच्या आडून राजकिय पोळी भाजू नये – राजेंद्र पातोडे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्याना धडा शिकवन्याचे नावाने भाजपाचे आज आंदोलन होणार असल्याची कावेबाज घोषणा बावनकुळे ह्यांनी केली आहे.भाजप वाल्यानी मनुस्मृति साठी होणारा विरोध दडपण्यासाठी डॉ बाबासाहेबाचा फोटो घटनेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू सुरू केला असून राजकीय अजेंडासाठी भाजपवाल्यांनी बाबासाहेबांच्या आडून राजकिय पोळी भाजू नये असा इशारा वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचे विरूद्ध दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.बाबासाहेबांचा नावाचा कैवार घेण्यासाठी तुम्ही तरी दुधाने धुतले नाहीत हे लक्षात ठेवा.
राज्यघटना तयार होत असताना भाजपच्या मातृसंघटनेनं अर्थात संघ आणि जनसंघानं बाबासाहेबांना त्रास दिला, त्यांचे पुतळे जाळले. राज्यघटनेला संघाने कधीच मान्य केले नाही. संघाचे दुसरे सरसंघचालक गोवळकरांनी राज्यघटनेला ‘ठिगळं लावलेली गोधडी’ संबोधून बाबासाहेबांचा अपमान केला होता.तेव्हा तुम्हीं कुठल्या बिळात लपून बसले होता ?
भारतातील प्रतिष्ठेची आणि समानतेची शक्ती म्हणून संविधानवादाच्या संस्कृतीबद्दल बाबासाहेबांच्या दृढ विश्वासाच्या भावनेलाच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील वर्तमान सरकारपासून धोका आहे . सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणामुळे सत्ताधारी पक्षाने राज्याच्या विविध एजन्सी थेट आणि पूर्ण काबीज केल्या आहेत. राज्यघटनेतील बदलांबाबत भाजपचे नेते उघडपणे आणि निर्लज्जपणे बोलत आहेत.तेव्हा तुमची तोंडे कशी शिवली जातात ?
राजस्थानमधील बाडमेर येथे एका निवडणूक सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाचे संविधान (भाजप) सरकारसाठी सर्वस्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते संविधान रद्द करू शकत नाहीत” हा तुम्हाला बाबासाहेबांचा अपमान का वाटला नाही ?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर भवन वर बुलडोझर चालविणारे हरिजन अधिकारी कर्मचारी फडणविस ह्यांनी प्रोटेक्ट केले होते.तुम्ही कोणत्या तोंडाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमान साठी आंदोलन करणार आहात?
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे तर जाहीरपणे बरळले होते की ’फुले – आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या’ हे विधान उच्च कोटीचा मूर्खपणा होता. सोबतच महापुरुषांच्या सामजिक सुधारणा कार्याच्या उभारणीला ‘भीक’ मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा केलेला सर्वात मोठा अपमान होता, तेव्हा तुमचे बावनकुळे आणि भाजपवाल्याना लकवा मारला होता का ?

तुमचे आंदोलन मनुस्मृतीला विरोध केला त्याचा सूड घेण्यासाठी त्यासाठी तुम्ही निम्मित शोधले आहे बाबासाहेबांच्या अवमानाचे.ही नाटकी आंदोलने बंद करा.
इतकाच पुळका असेल संवैधानिक व्यवस्था कायम रहावी तर संविधान बदलण्यासाठी ४०० पार म्हणणारे तुमचे नेते आणि दिल्लीत संविधान जाळले होते त्यावर कुठलीही कार्यवाही न झाली त्यासाठी आंदोलने करा.
दम असेल तर आधी आपल्या आंबेडकर द्रोही नेत्यांचे आणि संघी विचारधारे विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करा.मनुस्मृती साठी बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नका.तुमच्या ह्या मनुवादी आंदोलन कशासाठी होत आहेत, हे राज्यातील जनतेला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
094221 60101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!