महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा; विद्यार्थी वाचवा शिक्षक वाचवा

 आजची गोष्ट नाही, तर दोन हजार वर्षा पासुन बहुजन भारतीयांचा एकच दुश्मन आहे... दुश्मन सर्वांनाच माहित आहे.. आज ही तो दुश्मन बहुजन भारतीयांना गुलाम बनविण्याचे आपले कट कारस्थान अविरतपणे करित आहे. बहुजन भारतीयांना शिक्षणा पासुन वंचित करणे, त्यांना संपत्ति पासुन वंचित करणे, सर्वच मानवी अधिकारां पासुन वंचित करने, असे धोरण मनुस्मृति मध्ये लिखित आहे, वाचा... 

दुश्मन मनुस्मृति लागु करण्या करिता मोठ्या नियोजनबद्ध पद्धतिने बहुजन भारतीयांचे अधिकार नष्ट करित आहे. बहुजन भारतीयांना महापुरुषांच्या 108 वर्षांच्या संघर्षातुन संविधानात मिळालेले सर्व अधिकार दुश्मनाने शुन्य केलेले आहेत. दुश्मन आमचे शिक्षण बंद करित आहे, आमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉरलशिप बंद केलेले आहे, सरकारी नोकऱ्या बंद करून प्रायवेट कंपन्यां मार्फत वेठबिगारी सुरु केली आहे, आमच्या उरल्या सुरल्या शेत जमिनी हडपण्याचे कृषी कायदे केलेले आहेत, जि.प. च्या सर्व शाळा प्रायवेट कंपन्यांना विकण्याचा व क्लॉस-1 ते क्लॉस-4 ची सर्वच सरकारी पदे कंत्राटी पद्धतिने भरण्याचा 6सप्टे.2023 चा जीआर जो जनसामान्यांच्या संघटित विरोधा मुळे रद्द झालेला होता, तो जि.आर. जानेवारी 2024 ला मनुवाद्यांनी पुन्हा लागु केलेला आहे, शाळा प्रायवेट कंपन्यांना विकल्या नंतर गावांगावातील आमच्या बहुजन भारतीयांच्या मुलांना या प्रायवेट कंपनीच्या शाळेत मोठी फिस भरुन प्राथमिक शिक्षण घ्यावे लागेल, जो फिस भरू शकनार नाही तो प्राथमिक शिक्षण घेऊ शकनार नाही. प्रायवेट कंपन्यांना शाळा विकण्याच्या जि आर. ला जनसामान्य बहुजनांचा आजच प्रखर विरोध झाला पाहिजे, अन्यथा गुलामगीरी निश्चित आहे… कारण प्रायवेट कंपन्यांचा उद्देश्य केवळ नफा कमावण्याचा असतो. सरकारची जवाबदारी लोककल्याणाची असते, जनसामान्य लोकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जवाबदारी सरकारची आहे, प्रायवेट कंपन्यांची नाही.
प्रायवेट कंपनीला शाळा, शाळेची जमिन व इतर मालमत्ता लाखो रूपयांना विकल्या नंतर, विकत घेतलेल्या शाळेतुन प्रायवेट कंपनी नफा कमावण्याचा आपला व्यापार, धंधा सुरु करेल. एका प्रायवेट कंपनीने विकत घेतलेल्या शाळेत चक्क नट्यांचा नाच ठेवुन पैसे कमावले,हि वास्तविकता आहे.

जसे Jio कंपनीने लोकांना एक वर्ष सीम व नेट मोफत दिले होते, आज मात्र सर्वात जास्त रिचार्ज दर Jio कंपनीचे आहेत. याच धर्तीवर प्रायवेट कंपनी शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी सर्वांना मोफत शिक्षण देतील, जेणे करून शाळा विकत घेणाऱ्या प्रायवेट कंपन्यांना पालकांचा विरोध होऊ नये. दुसऱ्या वर्षी प्रायवेट कंपनी शाळेतील विद्यार्थ्यांवर फक्त 10/- रू. प्रती विद्यार्थी फी आकारेल तेव्हा पालक 10/- फी देतील, याचा अर्थ पालक प्रायवेट कंपन्यांना फि देण्यास तैयार आहेत, असा अर्थ होईल. तिसऱ्या वर्षी प्रायवेट कंपनी शाळेतील प्रती विद्यार्थ्यांवर 100/- रू. फि आकारेल तेव्हा पालक फी भरतील , आता चौथ्या वर्षी प्रायवेट कंपनी शाळेतील प्रती विद्यार्थ्यांवर 1000/- रू. फि आकारेल तेव्हा काही पालक प्रायवेट कंपनीच्या विरोधात कुजबुज करतील परंतु वेळ निघुन गेलेली असेल. पाचव्या वर्षी प्रायवेट कंपनी शाळेतील प्रती विद्यार्थ्यांवर 10,000/- रू. फि आकारेल तेव्हा मोजकेच पालक फि भरतील व बरेच पालक फि भरू शकनार नाहित, जे पालक फि भरनार नाहित त्यांच्या मुलांना प्रायवेट कंपनी शिक्षण देणार नाही. या पाचव्या वर्षी काही पालक प्रायवेट कंपन्यांचा विरोध करू लागतील परंतु खूप वेळ निघुन गेलेली असेल, प्रायवेट कंपन्यांच्या विळख्यात महाराष्ट्रातील सर्व जि.प. व सरकारी शाळा अडकलेल्या असतील तेव्हा जनसामान्य लोकं प्रायवेट कंपन्यांचा विरोध ही करू शकणार नाहित. भविष्यातील हा धोका ओळखुन जनसामान्य बहुजनांनी करो या मरो ची भुमिका घेऊन मनुवाद्यांचा हा काळा जिआर पेटवुन, प्रतिकात्मक होळी करून कंत्राटी पदभरतीचा व प्रायवेट कंपन्यांना शाळा विकण्याचा प्रखर विरोध आजच केला पाहिजे…!
जेव्हा जुनी पेंशन बंद करन्यात आली होती, तेव्हाच प्रखर विरोध झाला असता तर जुनी पेंशन योजना बंद करने मनुवाद्यांना शक्य झाले नसते. जुनी पेंशनच्या बाबतीत आजची परिस्थिती जनसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे.

पुढे सहाव्या वर्षी प्रायवेट कंपनी शाळेतील प्रती विद्यार्थ्यांवर 10,000/- रू. प्रती महिना फि आकारेल, तेव्हा त्यांना कुणीही रोखु शकनार नाहित, खुद्द न्यायालय ही रोखु शकनार नाही कारण प्रायवेट कंपन्यांना अनुकूल असे कायदे मनुवाद्यांनी पूर्वीच बनवुन ठेवलेले आहेत. जे पालक प्रायवेट कंपन्यांची फी भरू शकनार नाहित त्यांच्या मुलांचे शिक्षण बंद करून स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली चप्पला-जोडे कसे शिवायचे, टेबल कसे बनवायचे,….. अशा बारा बलुतेदार प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण दिले जाईल. जनसामान्य बहुजनांची मुले फक्त कामगार बनतील. जनसामान्य बहुजनांची मुले चुकुनही कुणी अधिकारी बनु शकनार नाही. जनसामान्य बहुजनांची खुप हुशार, प्रतिभावान व होतकरू मुले चुकुनही मोठ्या पदावर जाऊ नयेत अशी मनुस्मृतीची व्यवस्था प्रस्थापित करायला सुरूवात झालेली आहे. प्रायवेट कंपन्यांना शाळा विकणारा व कंत्राटी पदभरतीचा जिआर सरकारने लागु केलेला आहे. या काळ्या जिआर चा प्रखर विरोध करण्याची जवाबदारी आम्हा जनसामान्य बहुजनांच्या दारावर येऊन ठेपली आहे…
सावधान…. झोपु नका…जागे व्हा… सक्रिय व्हा…!

आम्हा जनसामान्य बहुजनांच्या मुलांना व येणाऱ्या हजारों पिढ्यांना गुलामीची जाणीव सुध्दा होणार नाही व आमची मुले कायमची वेठबिगारीच्या खाईत ढकलल्या जातील अशी दीर्घकालीन गुलामगीरीची व्यवस्था जनसामान्य बहुजनांवर थोपणाऱ्या विषारी मानसिकतेतुन कंत्राटी पदभरती व प्रायवेट कंपन्यांना शाळा विकण्याचा जिआर लागु करून मनुस्मृति व्यवस्था प्रस्थापित करण्याचा नियोजनबद्द कार्यक्रम मनुवादी राबवीत आहेत. उच्च शिक्षण तर आमच्या आवाक्याच्या बाहेर होणार आहेच, लिहुन ठेवा मनुस्मृति जशीच्या तशी लागु करण्याची सुरूवात झालेली आहे.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मनुस्मृति लागु करण्या इतपत दुश्मनाची हिम्मत वाढलेली आहे, महाराष्ट्रात दुश्मन सफल झाला तर हे संपूर्ण देशात लागु करतील.
सरकारने एकुण बजेटच्या 10.5% रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची अर्थसंकल्पात तरतुद असतांना शिक्षणावर केवळ 2.5% खर्च केले जाते. मनुवादी पैसा नाही असा खोटा प्रचार करून जनसामान्य बहुजनांची दिशाभुल करीत आहेत, सरकार प्रत्येक व्यक्ति वर, प्रत्येक सामानावर, प्रत्येक सेवेवर , प्रत्येक खरेदीवर व प्रत्येक विक्रीवर कर (टॅक्स) आकारतो सरकारने एक रूपया जरी टॅक्स वाढविला तरी एका दिवशी लाखों करोड़ों रूपये शासनाच्या तिजोरीत जमा होतील.… प्रश्न पैशाचा नाही तर प्रश्न मनुवाद्यांच्या मानसिकतेचा आहे. महात्मा फुलेंनी मनुवाद्यांच्या गुलामगीरीतुन जनसामान्य बहुजनांच्या आजादीचे आंदोलन सुरु केले, हे आंदोलन 108 वर्षे डॉ. बाबासाहेबांपर्यंत सुरु राहिले. शेवटी संविधानातुन मोफत व सक्तीचे शिक्षण तसेच अनेक मानवीय अधिकार जनसामान्य बहुजनांना मिळाले, त्यामुळे जनसामान्य बहुजनांची होतकरू मुले मोठ्या पदावर जाऊन बसली. जनसामान्य बहुजनांची संख्येने अत्यंत कमी मुले मोठ्या पदावर आहेत. जनसामान्य बहुजनांची हि थोड़ीसी प्रगती मनुवादी दुश्मनाला पचनी पडली नाही. मनुवाद्यांना त्यांच्या बरोबरीने जनसामान्य बहुजन खुर्ची लावुन बसलेला सहन सुद्धा होत नाही, इतकी विषारी मानसिकता आपल्या दुश्मना मध्ये आजही तुडुंब भरलेली आहे. मनुवाद्यांच्या या विषमतावादी विषारी मानसिकतेतुन आज महाराष्ट्र सरकारने शाळा प्रायवेट कंपन्यांना विकणारा व सर्व सरकारी पदे प्रायवेट कंपन्यां मार्फत भरून वेठबिगारी लादनारा व संविधानांने बहाल केलेले मानवीय अधिकार व संवैधानिक व्यवस्था उध्वस्त करनारा काळा जिआर सरकारने पुन्हा लागु केलेला आहे… अशा मनुवादी सरकारचा निषेध असो…!????????

आता आपण काय करावे…❓

 आम्ही भारताचे लोक, हि संविधान प्रस्तावनेची  पहिलीच लाईन आहे, वाचा…. 

कोणत्याही देशात त्या देशातील लोकं हेच सार्वभौम असतात. आपल्याला आपल्या दुश्मना सोबत लढायचे आहे, हि लढाई आता राजकिय राहिलेली नाही, हि लड़ाई विशिष्ट क्षेत्रा पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर हि लढाई संपुर्ण बहुजन भारतीयांच्या अस्तित्वाची लड़ाई बनलेली आहे. बहुजन भारतीयांना मनुवाद्यांच्या गुलामगीरी पासुन वाचविण्याची हि लड़ाई आहे. हि लड़ाई जनसामान्य लोकांची लड़ाई झालेली आहे. या लड़ाई मध्ये गावांगावातील प्रत्येक जनसामान्य माणसाला सामील करावे लागेल. गावांगावातील ग्रामसेवक, सरपंच व सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापण समितिचे सर्व पदाधिकारी, गावांगावातील आशावर्कर, नर्स, डॉक्टर, रोजगार सेवक, सर्व शिक्षक, आंगनवाड़ी सेविका, मदतनिस, सुशिक्षित बेरोजगार, सर्व शिक्षित व सर्व अशिक्षित लोकं, किसान, कामगार, व विशेष म्हणजे गावांगावातील प्रत्येक महिला या सर्वांना या लढाईत सामिल करावे लागेल. तसेच शाळेत जाणाऱ्या गावांगावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना या शाळा वाचविण्याच्या आंदोलनात सहभागी करावे लागेल.
प्रत्येक गावांतील शाळेत व अंगणवाडीत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचा बहुजन मुलनिवासी पालक संघ तयार करून मनुवाद्यांच्या विरोधात मोठा जनांदोलन उभा करावा लागेल . असे आपण नक्कीच करू शकतो. आज पासुनच आपल्या गांवातील प्रत्येक पालकांना, पदाधिकाऱ्यांना, कंत्राटसेवकांना, प्रत्येक कर्मचाऱ्यांना, गावांगावातील प्रत्येक जनसामान्य लोकांना, प्रत्येक महिलांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना मनुवादी दुश्मनाच्या या कट कारस्थानाची महिती द्या, सर्वांना वास्तविकता समजावुन सांगा…
शासनाचा जनवरी 2024 चा जि.प. व सर्वच सरकारी शाळा दत्तक योजनेच्या नावावर प्रायवेट कंपन्यांना विकणारा व सर्व सरकारी पदे प्रायवेट कंपन्यां मार्फत भरुन वेठबिगारी लादनारा काळा जिआर गांवागांवातील प्रत्येक व्यक्तिनी, जनसामान्य लोकांनी पेटवुन, काळ्या जिआरची प्रतीकात्मक होळी करून त्याचे व्हिडिओ, फोटो वॉट्सएप, फेसबुक व सोशल मिडिया वर शेअर करून मनुवाद्यांच्या या काळ्या जिआर चा निषेध नोंदवावा..
या जनआंदोलनात सर्व जनसामान्य बहुजन लोकांना सामिल करा… काळा जिआर पेटविण्याची हि आग सरकार पर्यंत पोहचली पाहिजे असे करण्यात जर आपण सफल झालो तर सरकारला या जनआंदोलना पुढे झुकावेच लागेल, हे लिहुन ठेवा…

सर्वच बहुजन भारतीयांनी आपले अस्तित्व वाचविण्याकरिता, आपल्या मुलांचे भविष्य वाचविण्याकरिता, आपले स्वाभिमान वाचविण्याकरिता, आपली पिढी वाचविण्याकरीता, आपली नोकरी वाचविण्याकरिता, आपला देश वाचविण्याकरिता, आपले स्वतंत्र वाचविण्याकरिता या काळा जिआर जलाओ आंदोलनात प्रत्येक गावांतील प्रत्येक व्यक्तिला सहभागी करून मोठ्या प्रमाणात आपला निषेध नोंदवुन हे आंदोलन भरघोष सफल करावे…
हेच सर्वांनाच आव्हान…

लड़ेंगे तो ही जितेंगे…!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!