४.३ किलोमीटर नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम झाल्याचा मनपाचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे
महानगरपालिका क्षेत्रातील अकोली, सिंधी कॅम्प, निमवाडी, कमला नेहरू नगर, अनिकट, सावतराम चाल, खोलेश्वर, मुख्य गणेश घाट, राम नगर, दगडी पूल, गुलजार पुरा, मासूमशाह कब्रस्तान, रमाबाई नगर, आरपीटीएस रोड ते रेल्वे पुलापर्यंतच्या नदीतील एकूण ४.३ किलोमीटर मोरना नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम २३ मे रोजी पूर्ण झाले आहे असा दावा मनपा कडून करण्यात आला असला तरी हा दावा खोटा असून स्थानिक युवकांनी फोटो व्हिडियो वंचित कडे पाठवून ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे.
त्यामध्ये अकोली गीता नगर बायपास या परिसरातील जलकुंभी जैसे थे आहे असे दिसत असून पावसाळ्यात तेथील नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी ह्यांनी भेट दिलेल्या जलकुंभी काढण्याची मोहीम ही अकोला शहरातील नागरिकांची फसवणूक करनारी आहे.अकोली गीता नगर बायपास या परिसरातील जलकुंभी कायम असताना २३ मे रोजी मनपा ने कुठले साडे चार किलो मिटर जळकुंभी काढली ह्याचा खुलासा मनपा आयुक्त व जलकुंभी काढण्याची जबाबदारी असलेले अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार ह्यांनी स्पॉट वर येवून करावा असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत