भारतमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बौद्धांचे चार प्रकार : एक विश्लेषण -राजेश चंद्र

भारतात चार प्रकारचे बौद्ध आहेत.

पहिले म्हणजे, पारंपारिक बौद्ध आहेत जे मुख्यतः लडाख, अरुणाचल, सिक्कीम, आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल इत्यादी प्रांतांमध्ये राहतात – चकमा, बरुआ, ताई इ. हे बौद्ध आहेत जे भारतातील बुद्ध धम्माच्या संकटात स्वतःला वाचवू शकतात आणि संकटात बुद्ध धम्माचा वारसा जपू शकतात. या बौद्धांनी बुद्ध धम्माचा मोठा अनमोल वारसा जपला आहे – परंपरांच्या रूपाने, दुर्मिळ ग्रंथांच्या रूपाने. ज्याप्रमाणे ख्रिश्चनांनी येशू ख्रिस्ताच्या वध स्तंभावरील रक्ताने माखलेला झगा, ज्याला ट्यूरिनचे आच्छादन म्हटले जाते, जतन केले आहे, त्याचप्रमाणे या पारंपारिक बौद्धांनी भगवान बुद्धांचे वास्तविक चिवर संपूर्ण आणि तुकड्यांमध्ये जतन केले आहे. तसेच, वापरलेल्या वस्तू जसे भगवान बुद्धांचे भिक्षापात्र, आसन, नखे इत्यादी.

अशा पारंपारिक बौद्धांच्या अगदी जवळ राहून मी खूप साहित्य जमवले आहे. त्यांपैकी बहुतेक भारतीय राज्यघटनेनुसार पारंपारिक बौद्ध अनुसूचित जमातींच्या श्रेणीमध्ये सूचीबद्ध आहेत. तो जन्मत: बौद्ध आहे. भगवान बुद्ध आणि बुद्ध धम्म त्यांच्या सर्व चालीरीती, सन-उत्सव, पूजा-विधी, श्रद्धा-विश्वास हे त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या नैतिक कथा, गोष्टी आणि म्हणींमध्येही फक्त बुद्धांचा समावेश आहे. त्यांच्या स्वप्नातही बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. म्हणजे त्यांच्या कल्पनेची आणि भावनेची जडणघडणही बुद्धमय आहे. या बौद्धांची संख्या सिंधी, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन अशा अल्पसंख्यांकांप्रमाणे आहे परंतु तरीही या समुदायांचे राजकीय मूल्य नगण्य आहे कारण त्यांच्यात राजकीय जाणीव फारच कमी आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यांची मते निर्णायक आहेत.

दुसरे म्हणजे, ते बौद्ध आहेत जे ओशोंचे अनुयायी किंवा जे अध्यात्मिक विद्वान आहेत. ते घोषित स्वरुपात बौद्ध नाही पण बौद्धिक स्तरावर त्यांनी भगवान बुद्धांचा मनापासून स्वीकार केलेला आहे. भगवान बुद्धांबद्दल त्यांच्या मनात अभिमानाची, गर्वाची भावना आहे. ते भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माला भारताची शान, अस्मिता मानतात.

तिसरे, ते बौद्ध आहेत जे सत्य नारायण गोयंका गुरूजी यांच्या आध्यात्मिक अभ्यास शिबिरांमध्ये विपश्यना साधक आहेत. विपश्यनेचे हे निष्ठावान साधक देखील घोषित स्वरूपात बौद्ध नाहीत परंतु त्यांना भगवान बुद्धांबद्दल खूप आदर आहे. जरी आपण असे मानले की, ते मानसिक स्तरावर परिपूर्ण बौद्ध आहेत, परंतु स्थायी स्वरूपानुसार ते सर्व सवर्ण-अवर्ण, हिंदू-मुस्लिम इत्यादी लोक आहेत.

चौथा प्रकार म्हणजे बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकरांमुळे स्वतःला बौद्ध समजणारे बौद्ध. त्यापैकी बहुतेक स्थायी स्वरूपात अनुसूचित जातीचे, पुर्वाश्रमीच्या हिंदू धर्मातील, परंतु ते सर्वात निष्ठावंत ‘स्वयंघोषित बौद्ध’ आहेत.

अशाप्रकारे, अघोषित स्वरूपात भारतातील एक मोठी लोकसंख्या बौद्ध किंवा बौद्ध अनुयायी आहेत.

या चार ही प्रकारच्या बौद्धांची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत.

पारंपारिक बौद्ध बोलीभाषा, प्रादेशिकवाद, रीतीरिवाजांमुळे ते बाकीच्या बौद्धांशी अनसंबंधित राहतात आणि बाकीच्या बौद्धांसाठी हे पारंपारिक बौद्ध कुतूहलाचा आणि आश्‍चर्याचा विषय आहे. बाकीच्या बौद्धांची त्यांच्याशी घट्ट मैत्री नाही किंवा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध नाहीत.

ओशोंच्या प्रभावाखालील बुद्धअनुयायी यांच्यासाठी बुद्ध आणि धम्म हा एक देखाव्याचा, केवळ तात्विक – चर्चेचा आणि परिचर्चेचा विषय आहे. सांस्कृतिक पटलावर, ते आपापल्या मान्यतांमध्ये आणि श्रद्धांमध्ये जितके कट्टर आहेत की जितके तथाकथित धार्मिक कट्टरवादी कट्टर असतात. भारतातील सामाजिक-सांप्रदायिकता-धार्मिक विषमता इत्यादींशी त्यांचा फारसा संबंध नाही. बुद्धप्रेमी-ओशोप्रेमी नावाचा एक समुदाय आहे ज्यांच्यामध्ये त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. परंतु बाकीच्या बौध्द जाणकारांशी त्यांची मैत्री जवळपास शून्य आहे.

विपश्यना करणाऱ्या, ध्यानधारणा करणाऱ्या बौद्धांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी फक्त विपश्यना आहे.
दहा दिवसीम-वीस दिवसीय, सतीपठन शिबिरे करणे हे त्यांच्या आत्मचिंतना बाबतची परीकाष्ठा आहे. त्यांची विपश्यनेची आवड अप्रतिम आहे. एक प्रकारे ते धम्माला व्यावहारिक स्तरावर जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते मनाच्या खोल स्तरावर परिवर्तनाची किमया करण्यात गुंतलेले असतात. हे विपश्यना करणारे साधक स्वतःला बौद्ध म्हणत नाहीत परंतु ते बौद्ध म्हणवणाऱ्यांपेक्षा अधिक निष्ठावान बौद्ध आहेत. पण त्यांचाही सामाजिक चिंतेशी काही संबंध नाही किंवा असला तरी तो नगण्य आहे.

आता चौथ्या प्रकारचे बौद्ध जे बोधिसत्व बाबासाहेबांच्या प्रभावाखाली स्वतःला बौद्ध मानतात. त्यांच्यासाठी सामाजिक चिंता ही प्राथमिक प्राधान्य आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ नंतर हा समाज अस्तित्वात आला. काही लोक या नव्या समाजाला भीमायानी किंवा नवयानी किंवा धर्मांतरीत बौध्द म्हणू लागले आहेत. हे धर्मांतरीत बौद्ध भारतातील सामाजिक राजकीय धार्मिक विसंगती सोडवण्यासाठी सर्वात उत्साही आणि सक्रिय आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील बौद्धांच्या एकूण लोकसंख्येपैकी १३ टक्के लोक पारंपारिक बौद्ध आहेत आणि उर्वरित ८७% धर्मांतरीत बौद्ध आहेत.
भारताला बौद्धमय बनवण्याचे या धर्मांतरीत बौद्धांचे सर्वात मोठे स्वप्न आहे. जातीविरहित समाज निर्माण करणे हे त्यांचे मुख्य प्राधान्य आहे. परंतु या धर्मांतरीत बौद्धांमध्ये चार प्रकारचे बौद्ध आहेत:

१. झोपलेले बौद्ध
२. मौखिक बौद्ध
३. विस्तारवादी बौद्ध
४. आचरणशील बौद्ध

झोपलेले बौद्ध :
झोपलेले बौद्ध म्हणजे हे खरेखुरे बौद्ध नाहीतच. बाबासाहेबांच्या जयंती आणि बुद्ध जयंती निमित्त ते उत्सवांमध्ये ‘नमो बुद्धाय, जय भीम’ हे संबोधन वापरतात. वर्षातील उरलेले दिवस ते सर्व त्यांच संस्कारात रमतात ज्या संस्कारातून बाबासाहेबांनी मुक्त होण्याचे आवाहन केले होती. (हिंदू धर्मातून.)

मौखिक बौद्ध :
मौखिक बौद्ध हे सर्वात तोंडसुख घेणारे आहेत. हिंदुत्व, ब्राह्मणवाद, मनुवाद, अंधश्रद्धा, दांभिकता इत्यादींवर टीका करणे, नींदा आलोचना करणे हे त्यांचे प्राधान्य आहे परंतु त्यांच्या दैनंदिन व्यवहारात, संस्कारात आणि आचरणात बुद्ध धम्माची सावलीही पडत नाही. ते फक्त टीका-टिप्पणी, शल्यक्रिया, दुषणे देणे, विश्लेषण करणे इत्यादींना बुद्ध धम्म मानतात. त्यांना रामचरितमानस मधील कोणत्या चौपाई, दोहे निंदनीय आहेत हे माहीत आहे, पण धम्मपदातील कोणती गाथा प्रशंसनीय आहे हे त्यांना माहीत नाही. त्यांना त्रिरत्न वंदना, पूजाही येत नाही. त्यांना विपश्यना ही आरएसएसचा अजेंडा दिसते, त्रिपिटकाती आर्य आष्टांगीक मार्ग सुद्धा ब्राह्मणवाद वाटतो, ध्यान-साधना-सुत्तपठन, विपश्यना इत्यादी शल्यक्रिया सर्व काही मनुवादी वाटते. त्या सर्वसाठी ’22 प्रतिज्ञांच प्रमाणबद्ध’ आहेत. त्यामध्येही फक्त पहिल्या तीनवरच त्यांचा भर आहे. बाकीच्या प्रतिज्ञांचे ते स्वतःही पालन करत नाहीत. त्यांना काय चूक आहे हे चांगलेच माहीत आहे. पण बरोबर काय आहे याची त्यांना जवळजवळ जाणीव नसते किंवा ते त्याचे पालन करत नाहीत.

नमाज न जाणणारा मुस्लिम सापडणे कठीण आहे.
गुरु ग्रंथ साहिबचे श्लोक आठवत नाहीत असा शीख सापडणे कठीण आहे.
बायबलमधील काही सनात आठवत नसलेला ख्रिश्चन सापडणे जवळजवळ अशक्य आहे, असा हिंदू सापडणे अशक्य आहे. ज्याला एकही आरती हनुमान चालीसा स्तुती-भजन माहीत नाही, पण असे तथाकथित बौद्ध लाखोंच्या संख्येने सापडतील, ज्यांना त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा-त्रिशरण वंदना याविषयी काहीच माहिती नाही, पण थापा मारून स्वत:ला बौद्ध म्हणवून घेतात.

या मौखिक असलेल्या बौद्धांची विचारसरणी क्रांतिकारी, तार्किक आहे. हेच ते बौद्ध आहेत जे बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात सर्वाधिक सक्रिय असतात.

विस्तारवादी बौद्ध :
विस्तारवादी बौद्ध ते आहेत जे निंदा-टीका-शल्यक्रिया, दुषणे, विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन खर्‍या अर्थाने दैनंदीन व्यवहारात धम्माचे पालन करतात. तो त्रिशरण, पंचशील, बुद्ध-पूजा-त्रिरत्न वंदना-सुतपाठ जाणतो. वाढदिवस, विवाह, गृहप्रवेश इत्यादी प्रसंगी आदरणीय भन्ते किंवा बोधाचार्यांकडून विधी केले जातात. जुने संस्कार सोडून त्यांनी बौद्ध संस्कार जीवनात आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने बौद्धमय भारत घडवण्याच्या दिशेने त्यांची आगामी वाटचाल सुरू आहे. हे १००% खरे आहे की, नुसती निंदा, नालस्ती, टीका करून भारत बौद्धमय होणार नाही. सकारात्मक पर्यायांवर व्यावहारिक कार्य करून भारत बौद्धमय होईल.
धर्मांतरीत बौद्धांमध्ये हा विस्तारवादी बौद्ध हा आशेची मशाल आहे.

आचरणशील बौद्ध :
आचरणशील बौद्ध, त्यांना धम्माचे खरे – वास्तविक नायक म्हटले पाहिजे, जे धम्माच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते ध्यान-साधना-विपश्यना करतात, ते बुद्धाच्या वचनांचा त्यांच्या मूळ स्वरूपात अभ्यास करतात, ते त्रिपिटकातील धम्माचा सखोल अभ्यास करतात, ते शुन्यागारात ध्यान करतात. ते उपोसथ धारण करतात. ते धम्माच्या आध्यात्मिक बाजूला सर्वोच्च प्राधान्य देतात आणि सामाजिक कारणांसाठी सकारात्मक आणि रचनात्मक योगदान देतात. त्यांना धम्माचे मार्मिक ज्ञानी, भेदक म्हणता येईल.
भारतात बौध्द धम्म सातवी संगती (परिषद) आयोजित करणे हे या बौद्धांचे स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत. बाकी बौद्धांच्या मनात ही गोष्ट कल्पनेतही नाही. केवळ हेच आचरणशील बौद्ध भारताला खऱ्या अर्थाने बौद्धमय बनवतील.

अधिक विशेषतः हे चार स्वतंत्र गट किंवा व्यक्ती नाहीत चारही सारखेच आहेत.
झोपलेला बौद्ध एक दिवस मौखिक बौद्ध बनतो. मौखिक बौद्ध हाच पुढे विस्तारवादी बौद्ध बनतो आणि हा विस्तारवादी बौद्ध पुढे जाऊन एक दिवस आचरणशील बौद्ध बनतो. हे देखील शक्य आहे कारण विस्तारवादी बौद्ध आणि आचरणशील बौद्ध हे सध्या त्यांच्या संक्रमणकालीन कालावधीतून (Traditional Period) जात आहेत. आणी हीच उत्क्रांतीची, परिवर्तनाची, विकासाची प्रक्रिया आहे (Process of Evolution). हा विकास स्वतःच्या प्रयत्नाने आणि प्रशिक्षणातूनही होतो. जबरदस्तीने काहीही साध्य होत नाही. ऐच्छिक विकास हाच मोठा क्रांतिकारी परिणाम देतो.

जे मौखिक बौद्ध आहेत त्यांनी तिथे झोपलेल्या बौद्धांची लोकांची खोड काढू नये, तर हे लक्षात ठेवावे की, ते स्वतः तिथे कधी काळी होते. विस्तारवादी बौद्धांनी मौखिक बौद्ध लोकांना विस्तारवादी बौद्ध बनण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी उपाययोजना कौशल्य वापरावेत. आचरणशील बौद्धांनी उरलेल्या तिघांशीही मैत्रीपूर्ण वागावे. विस्तारवादी व आचरणशील बौद्धांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसा भारत बौद्धमय होत जाईल.

भारताच्या सर्व प्रकारच्या बौद्धांमध्ये घनिष्ठ मैत्री आणि परस्पर सामंजस्यपणा (Mutual Understanding) वाढत राहिली तर भारत हा शिघ्र वेगाने बुद्धमय होईल, कारण बुद्धांचे वचन आहेत – “मैत्री हाच संपूर्ण धम्म आहे!”

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!