बालविवाह मुक्त भारत साठी निर्धार..!


कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व युवा ग्रामीण विकास मंडळ यांच्यावतीने बार्शी तालुक्यातील नारी,चिखर्डे,पांगरी,पानगाव,वैराग आदी तेरा गावात बालविवाहनिर्मूलनाचे काम सुरू आहे. गावातील ग्रामसेवक,सरपंच, अंगणवाडी, सामाजिककार्यकर्ते, यांच्यासोबत चर्चा करून गाव स्तरीय बाल संरक्षण समिती सक्षम करण्याविषयी काम सुरू आहे. तसेच गावातील किशोरवयीन मुलं मुली, गावातील लोक, महिला बचत गटातील सदस्य, शाळेतील कर्मचारी गावकरी यांच्यासोबतविविध कार्यक्रमाच्या आधारे बालविवाह रोखने बाबत विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करण्यात येत आहे.
बार्शी तालुक्यातील शाळा, कॉलेज, अंगणवाडी, ग्रामपंचायत, इत्यादी ठिकाणी जाऊन बालविवाह निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. युवा ग्राम संस्थेच्या संस्थेचे प्रमुख एच पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समूहसंघटिका (CSW ) शारदा गायकवाड अविरतपणे काम करीत आहेत. तसेच अक्षयतृतीया निमित्त व लग्न सराई निमित्त ग्रामीण भागात जास्तीत जास्त विवाह केले जातात. त्यात बालविवाह होऊ नये म्हणून मंदिर, मस्जिद, बुद्धविहार, मंगलकार्यालय इत्यादी ठिकाणी जाऊन जनजागृती केली जात आहे. व कुटुंबात जाऊन बालविवाह करणार नाही असे पालकाकडून जनजागृती करून हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे. युवा ग्राम संस्थेचे एचपी देशमुख यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात अवती भवती कोठे बालविवाह होत असल्याससंस्थेच्या कार्यकर्त्या शारदा गायकवाड व चाईल्ड लाईन, बाल संरक्षण समिती, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करावा. आपण सर्वांनी एकत्र येऊन 2030 पर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे विनंती करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत