दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

दिनविशेष – सोमवार दिनांक 27 मे 2024

आज दि. २७ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, चंदवारो, वेसाख मासो, सोमवार, वैशाख माहे.

२७ मे १९२८ – रोजी समाज समता संघातर्फे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत श्रिधरपंत टिळकांच्या दुखवट्याची सभा पार पडली.

२७ मे १९३५ – रोजी महासूर्याची सावली, कोट्यावधीची माऊली, करुणेचा महासागर, त्यागाचे सर्वोच्च प्रतीक, त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे राजगृह दादर या राहत्या घरी निधन झाले.

२७ मे १९४७ – रोजी मुंबईतील एच एम आय डॉकयार्डमधील अस्पृश्य कामागारांमार्फत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १००१/- रुपयांची थैली अर्पण करण्याचा समारंभ सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पार पडला.

२७ मे १९५३ – रोजी नरे पार्क तसेच वरळी येथील आंबेडकर मैदानावर बुद्धांची जयंती, महानिर्वाण दिनानिमित्त आयोजित सभांमधून विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना बौद्ध धंम्म स्वीकारण्याचे आवाहन केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!