साजिद पठाण ह्यास पोलिसांनी फरार घोषित करावे – राजेंद्र पातोडे
मौलवीना शिवीगाळ व बाळासाहेब आंबेडकर बाबत अपशब्द प्रकरणी फरार असलेल्या काँग्रेस नेता आरोपी साजिद खान पठाण ह्यास आज देखील बेल मिळाली नसून न्यायालयाने २८ तारीख दिली आहे. पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर त्याला फरार घोषित करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
ह्या प्रकरणात गुन्हे दाखल असून पोलिसांना आरोपी हुलकावण्या देत असल्याचे पोलीस सांगत आहेत.पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर मग त्याला फरार घोषित करा आणि ज्याचे मुळे वाद झाले तो काँग्रेस कार्यकर्ता देखील पोलीस शोधू शकत नाहीत, ही आश्चर्य असून ह्या प्रकरणी ज्या मौलाना ह्यांना शिवीगाळ करण्यात आली त्यांनी पोलिसांना आपले बयान देखील दिले आहे.त्यामूळे शिवीगाळ करून तो मी नव्हे असा खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता.
मौलवीना शिवीगाळ व बाळासाहेब आंबेडकर बाबत अपशब्द प्रकरणी काँग्रेस नेता आरोपी साजिद खान पठाण बाबत काँगेस मौन का ?
ह्या प्रकरणी काँग्रेस चे नेते मंडळी तोंडात गुळणी धरून का बसली आहे? असा सवाल देखील वंचितने विचारला आहे.काँग्रेस नेत्यांना शिवीगाळ करून देखील त्याचे विरूद्ध कार्यवाही करण्याचे धाडस काँग्रेसला दाखवता आले नव्हते.त्यामुळे आता चक्क धर्मगुरू ह्यांना शिवीगाळ करून नेतेगिरी करण्याचा प्रयत्न साजिद पठाण ह्याने केला होता.मात्र वंचित सोबत नाद करायचा नाही, ह्याचा विसर पडलेला हा नेता आव्हान देत असताना आता गुन्हे दखल झाल्या पासून तोंड लपवून फिरत आहे.काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र ह्या प्रकरणी साधा निषेध व्यक्त करीत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.जिल्यातील काँगेस नेते इतके घाबरत का आहेत ? ह्याचे उत्तर अकोल्यातील नागरिक मागत आहेत.
फरार आरोपीच्या अंतरीम जामीन अर्जावर आज सुनावणी झाली नसली तरी न्यायालयाने पुढील तारीख २८ मे दिली आहे.त्यापूर्वी पोलिसांनी साजिद पठाण ह्यास फरार घोषित करून अटक केली पाहिजे, अशी अपेक्षा देखील वंचित कडून व्यक्त करन्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत