नवाब मलिक अजित पवार गटात

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती . यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
काल हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्यातच आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत