
गेल्या १२ दिवसांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी पण, बचावकार्य पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.
बचावकार्य सुरू असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशिनमधील बिघाड झाली होती. ही समस्या सोडविण्याचे काम काल(गुरूवारी) रात्रभर सुरू होते. या समस्येमुळे गेल्या 15 ते 16 तासांपासून खोदकामाचे काम होऊ शकले नाही. काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, जेणेकरून बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत चर्चा करण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत