शिवतीर्थावर ठाकरे गटाचा शिमगा मेळावा ; या मुखमंत्र्याच्या विधानावर – पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही असे संजय राऊत यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री शिंदे यांनी रामलीला समितीच्या कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे यांचा शिवतीर्थावर मेळावा होणार आहे. पण, तो शिमगा मेळावा होणार आहे. मोदीजी आणि आमच्यावर टीका करणारा हा मेळावा असेल. हा मेळावा शिमग्याला करायला पाहिजे. शिमग्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मेळावा घ्यायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. गाढव गेलं आणि ब्रम्हचारही गेलेलं आहे. रामलीला, अयोध्या आणि राम मंदीर आमच्यासाठी श्रध्देचा विषय आहे. अशा प्रकारे आपली संस्कृती पुढे नेण्याचे नियोजन चांगलं केलं आहे. न भूतो न भविष्यती असा रेकोर्ड मोडणारा दसरा मेळावा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर आज दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आधी ठाकरे गटाने शिंदे गटावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. रावण हा अहंकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. आज दसरा मेळावा त्या रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. 2024 च्या दसरा मेळाव्यावेळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्यकर्ते बसले असतील. पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली आहे. मोहन भागवत लोकशाही मानत नाहीत का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? मोहन भागवत यांना लोकशाहीचे आम्ही संरक्षक मानतो. या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का? मी मोहनराव भागवतांना एक सांगू इच्छितो की, बाळासाहेब देवरस सरसंघ चालक हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. तेव्हा देखील भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. तेव्हा भारतीय जनता पक्ष देखील होता. त्यांनी हुकूमशाहीचा पराभव केला, असं संजय राऊत म्हणाले.
मोहन भागवत यांना सांगण्याची गरज नाही. बहुदा त्यांना इतिहास माहीत असावा. या त्यांनी अडवाणींच्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात सर्व घटना उल्लेख केलेला आहे. ते पुस्तक मी मोहनराव भागवत यांना पाठवत आहे, असंही राऊत म्हणाले.
.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत