शहिद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय कांबळे यांचे दुःखद निधन

अहमदपूर दि. 21 (कारामुंगीकर)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्ष लढ्यातील पहिले शहिद नामांतर विर शहिद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय पोचिराम कांबळे यांचे आज दि. 21 मे 2024 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1.30 वाजता सिडको – नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्ष लढ्यात आपला पती वीर पोचिराम कांबळे यांना आत्मिक बळ देण्याचे खूप मोठे सामाजिक काम यांनी केले. त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना मायेचा आशीर्वाद देऊन रात्री बेरात्री जेवणाची, आराम करण्याची व्यवस्था केली. कार्यकर्त्यांना मातेप्रमाणे वागणूक दिली. अशा या वीर मातेने आज दिनांक 21 मे 2024 रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे. दैनिक जागृत भारत तर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत