डीएनए (डिॲक्सी न्युक्लिक ॲसिड) विषयी एक चर्चा
अशोक सवाई.
आज २१ मे आजच्याच दिवसी म्हणजे २१ मे २००१ या दिवशी अमेरिकेतील महान वैज्ञानिक मायकेल बामशाद यांनी भारतातील ब्राह्मणांच्या डिएनए चा शोध घेवून ते भारतातील मुळ निवासी नाहीत म्हणजेच ब्राह्मण भारतात विदेशी आहेत हे सिद्ध केले. म्हणून भारतीय मूलनिवासींसाठी ऐतिहासिक दृष्ट्या २१ मे हा दिवस महत्वाचा ठरतो.
आज डी एन ए विषयी देशातील बहुतांश बहुजनां मध्ये जागृती झाली आहे. इथले मुळ निवासी व विदेशी ब्राह्मणांचा डी एन ए हा एकमेकांशी जुळत नाही याचा प्रसार, प्रचार बहुजनां मध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय? नागपूरातील ६ आक्टोबर २०२२ मध्ये बामसेफच्या मोर्चात ब्राह्मण भगाव भारत बचाव असे नारे किंवा घोषणा देण्यात आल्या. हे नुसते नारे नव्हते तर बहुजन आतापर्यंत ज्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या अन्याय, अत्याचाराच्या जात्यात भरडला गेला, नागवला गेला या नाऱ्यांतून त्यांचा आक्रोश बाहेर पडत होता, पडत आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही बहुजनांवर ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेले अन्याय अत्याचार कमी झालेले नाहीत. ही वस्तूस्थिती आहे. म्हणूनच आज बहुजनां मध्ये एवढी अभूतपूर्व जागृती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळते. पण प्रथम ज्यांनी या डिएनए वर संशोधन केले ते प्रा. डॉ. मायकेल बामशाद एम. डी. यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती असेल. आधी त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ व नंतर त्यांच्या संशोधनाविषयी चर्चा करू.
मायकेल बामशाद हे अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. ते अमेरिकेमधील इक्कल्स इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स मध्ये डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रीक्सचे हेड ऑफ डिपार्टमेंट, तसेच अमेरिकेतील उताह युनिव्हर्सिटी मध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. अमेरिकेमधील प्रसिद्ध जेनेटिक सायंटिस्ट आहेत. भारतीयांच्या डी एन ए संशोधना बरोबरच त्यांनी इतर सहा वेगवेगळ्या महत्वाच्या विषयावर संशोधने केलेली आहेत. भारतामध्ये जवळजवळ ५ वर्षे राहून भारतीयांचे अनुवांशिक मूळ शोधण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्या संशोधनाचे टायटल आहे भारतातील जातींच्या उगमाचे अनुवांशिक पुरावे.
त्यांच्या डी एन ए संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, भारतातील ब्राह्मणांचा डि एन ए हा युरेशियन लोकांच्या डी एन ए शी ९९.९९ टक्के जुळतो. परंतु तो इतर भारतीयांशी फक्त ००.०१ टक्केच जुळतो. याउलट ब्राह्मण सोडून बाकी सर्व भारतीयांचा डी एन ए हा एकमेकांशी ९९.९९ टक्के जुळतो. याचाच अर्थ असा आहे की, एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डी एन टी, व्हीजेएनटी, एक्स सीटी, धर्म परिवर्तीत अल्पसंख्याक (मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत, बुद्धिस्ट, शिवधर्मीय) हे सर्व लोक अनुवांशकरित्या एकमेकांशी जवळचे आहेत. आणि ते सर्व भारताचे मूळ निवासी आहेत.
परंतु ब्राह्मण हे भारतामध्ये विदेशी आहेत. व त्यांचे मूळ स्थान रशिया आहे. म्हणूनच बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम व महासचिव प्रा. विलास खरात हे वेळोवेळी आपल्या भाषणातून सांगतात की ब्राह्मण लोकांचे मूळस्थान रशियाच्या पश्चिमेकडील काळ्या समुद्राच्या जवळ आहे. वर्तमानात काही ब्राह्मण विचारवंत ब्राह्मणांचे नाते ज्यु, इजिप्शियन, ग्रीक, अरब, जर्मन, रोमन वगैरे लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हे खरे नाही. हे प्रा. डॉ. मायकेल बामशाद यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केले आहे.
विज्ञानाचा निकाल: ब्राह्मण विदेशी असल्याचे डि. एन. ए. संशोधनाने सिद्ध या आपल्या संपादन केलेल्या पुस्तकात प्रा. विलास खरात/डॉ. प्रताप चाटसे पान नं. ७ वर म्हणतात. “मायकेल बामशाद हे जागतिक स्तरावरील व्यक्तीमत्व आहे. त्यांनी रीतसरपणे भारत सरकारकडे पत्र लिहिले. भारतातील डी एन ए रीसर्च करण्यासंदर्भात परवानगी मागितली. भारत सरकारने दिली सुध्दा. RDO (रीसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) लेबाॅरटरी, हैदराबादमध्ये जावून संशोधन केले. भारत सरकारने त्यांना हे संशोधन करण्यास मान्यता दिली व टीम सुध्दा दिली. मायकेल बामशादसह १८ वैज्ञानिकांचा समूह होता तर भारतातील ६ विश्वविद्यालये यात सहभागी होते आणि ७ अमेरिकेच्या वैज्ञानिक संस्थांचा यात सहभाग होता”
त्यानंतर हा डी एन ए रिपोर्ट दि. २१ मे २००१ रोजी जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात आला. या डिएनए नुसार विदेशी ब्राह्मणांचा डिएन गृप R1 A1 तर आपल्या मूलनिवासींचा डिएनए L3 MN आहे. परंतु भारतातील स्थानिक व भाषीय वृत्तपत्रांमधून तो रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला नाही. किंवा होवू दिला नाही. कारण स्पष्ट आहे की, भारतातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. नाही म्हटले तरी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये एक छोटीशी बातमी या रिपोर्ट विषयी आली होती. परंतु बहुजन लोक इंग्रजी पेपर किती वाचतात? आणि वाचला जरी असेल तरी त्यापैकी किती जणांना हा किचकट विषय कळला असेल? कळला जरी असला तरी २००१ पासून किती लोकांनी या विषयावर चर्चा केली? हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणून २००१ पासून ते आत्ता आतापर्यंत या विषयावर गंभीर चर्चा झालेली दिसून येत नाही.
हे सर्व संशोधन बामसेफ, बहुजन मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या संघटनांनी उजागर केल्यावर हे संशोधन बहुजनांपर्यंत पोहचले. आणि त्यामुळे आता त्यांचा आक्रोश बाहेर येवू लागला. जसजसा या माहितीचा प्रसार व प्रचार भारतीय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपत जाईल तसतसा आक्रोश वाढत जाईल. तेव्हा ब्राह्मणांना एकतर आपला वर्चस्व वाद सोडून समतेचा व संविधानाचा पुरस्कार करावा लागेल. किंवा आपल्या हटवादी भुमिकेपायी जगात दुसरीकडे पर्यायी व्यवस्था शोधावी लागेल.
संदर्भ: विज्ञानाचा निकाल: ब्राह्मण विदेशी असल्याचे डि. एन. ए. संशोधनाने सिद्ध संपादन प्रा. विलास खरात/डॉ. प्रताप चाटसे.
-अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत