अकोला पोलीसांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीस दलाची प्रतिमा कमालीची खालावली – वंचित बहुजन आघाडी.
अकोला, दि. १९ – अकोला जिल्ह्यात पोलीस कोठडी मध्ये पोलिसांकडून अमानुष प्रकार करीत केलेल्या खुनाची शाई वाळत नाही तोच महिला तक्रारदार हिच्याशी लगट करण्याची तक्रार दाखल होणे आणि त्यानंतर आज खदान पोलीस स्टेशन ठाणेदार विरुद्ध नागपुरात विनयभंग दाखल झाल्याने अकोला पोलीसांची असल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीस दलाची प्रतिमा कमालीची खालावली असून जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांचा आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी ह्यांचे वर कुठलाही वचक नसल्याचे सिद्ध करते.पोलीस दलाची ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वाट पोलीस विभागाने पाहू नये असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र
पातोडे ह्यांनी दिला आहे.
यातील अनेक घटना मध्ये अकोट पोलीस स्टेशन मध्ये घडलेली पोलीसांनी केलेल्या कोठडीतील खुनाची आहे.केवळ चोरीच्या संशयावरून गोवर्धन हरमकार ह्याचा अमानुष छळ करीत त्याचे पार्श्व भागात दांडा टाकून त्याचे पासोळ्या तुटे पर्यन्त बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला गेला.हयात अकोट शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय राजेश जवरे यांच्यासह पोलिस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके व काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अकोट पोलिसांत भादवी कलम ३०२, ३४ नूसार विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र ज्या ठाण्यात हा खून झाला त्याचा ठाणेदार तपन कोल्हे ह्याला सह आरोपी न करता केवळ त्याची बदली करण्यात आली.अकोट पोलीस स्टेशनमध्ये असलेला कोठडी कडील सीसीटिव्ही कॅमरतील फुटेज गायब करण्यात आले.तपास सीआयडीकडे गेला तरीही ३०२ चे गुन्हा मध्ये जवरे आणि सोळंके दोघांना जमीन मिळाला आहे.
त्यानंतर छाननी
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन येथील फिर्यादी महिलेला शरीरसुखाची मागणी करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला ह्यात बाळकृष्ण येवले ह्या पोलीस हवालदाराचे निलंबन करण्यात आले.तोच आज खदान पोलीस स्टेशन ठानेदार धनंजय सायरे विरुद्ध नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.स्पर्धा परीक्षा करीता मार्गदर्शन करण्याचे नावावर नागपूर येथील हॉटेल मध्ये बोलवून विनय भंग केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनी कडून करण्यात आला असून तिचे वडिल देखील पोलीस दलात कार्यरत आहेत.ह्या तिन्ही घटना व्यतिरिक्त अनेक घटना मध्ये पोलीस दलात तक्रारी दाखल न करून घेणे, तक्रार दाखल केली तरी आरोपी अटक होणार नाही ह्याची सेटिंग लावली जाते, जिल्ह्यात अवैध दारू, अवैध वाळू, जुगार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणत वाढली आहे.त्यात महिला अत्याचार घटना असो की इतर कुठलीही गंभीर अपराध जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांना भेटून निवेदन दिल्या शिवाय कार्यवाही होत नाही.अनेक प्रकरणात तर जिल्हा पोलीस अधिक्षक ह्यांना भेटून देखील विविध पोलीस स्टेशन मध्ये कायदेशिर कार्यवाही होताना दिसत नाही.व्यापारी अपहरण, सामान्य नागरिक ह्यांचे घरी चोऱ्या, मोठया उद्योगपती ह्यांचे कडे दरोडा टाकण्यात आला आहे.ह्या घटना पाहता जिल्हा पोलिस प्रमुख बच्चन सिंह यांनी आपली कार्यशैली बदलणे गरजेचे आहे.
राज्याचे गृहमंत्री पक्ष फोडून सरकार चालविण्यात व्यस्त असल्याने कंत्राटी पद्धतीने गृहमंत्री भरती करण्याची मागणी जनतेने रेटली पाहिजे.सबब पोलीस प्रशासना विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वाट बघत बसू नका तातडीने पोलीस दलात शिरकाव झालेली गुन्हेगारी आवरा असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत