बुध्दसृष्टी कळंब येथे बुध्दजयंती निमित्त आयोजित महिला धम्म शिबिराचा समारोप व विविध कार्यक्रमांचे आयोजन.
तमाम जनतेस व श्रध्दावान बुद्ध उपासक बंधू भगिनींना बुद्धजयंती च्या तीरीवर शुभेच्छा. अखिल जगतातील बुद्धराष्ट्रत सिदार्थ तथागत, भगवान गौतमबुद्धाची जयंती खूप मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करतात. आणि, तथागताच्या जीवनातील अति महत्वाच्या घडलेल्या तीन घटनाच्या बाबत स्मरन करतात आणि याभावपूर्ण स्मृतीतुन स्वतःप्रति मंगलमय कामना करतात अखिल मानवाच्या कल्याणा प्रति तथागताना याचना करतात.
याचअनुषंगाने, बुद्धसृष्टी धम्म स्थळी महिला, मुलीनं साठी निवासी दहा दिवसाचे धम्म प्रशिक्षण शिबीर घेतलेले आहे. त्या प्रशिक्षण शिबीरचा समारोप व जयंती उत्सव कार्यक्रम अपणा सर्वांच्या उपस्थितीत करण्याचे आयोजित कलेले आहे.तेंव्हा आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
सकाळी 10-00 वाजता धम्मध्वजाचे ध्वजारोहण 10-30 ला महामानवाच्या प्रतिमेचे पूजन, व
सामूहिक वदंना 11ते 12 च्या आत प्रशिक्षणार्थी चे भोजन मान्यवराच्या हस्ते प्रशिक्षणार्थी ना प्रमाणपत्र देणे, मनोगत, त्यानंतर, इतरही उपासकना अभिवादनपर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाईल.
शाहीर मधुकर कदम यांचे बुद्ध,भीमगीत गायन पण होईल तेव्हा आपण सर्वांनी बुद्ध सृष्टी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व धम्म श्रवणाचा लाभ घ्यावा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत