महात्मा फुलेंचे परशुरामास पत्र..
चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायाणाचा अवतार यांस.
मुक्काम सर्वत्र ठायी.
अरे दादा परशुरामा, तू ब्राम्हणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तू कडू का होईना, परंतु विधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्या सारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राम्हण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राम्हण त्यापैकी कित्येक ब्राम्हण विविधज्ञानी बनून बसले आहेत, त्यांना काही अधिक ज्ञान सुद्धा देण्याची तुला जरुरी पडणार नाही. फक्त तू येथे ये आणि त्यांनी शुद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चान्द्रायण प्रायच्छीत देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामर्थ्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वैगेरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. तू या नोटिशीच्या तारखेपासून सहा महिन्याचे आत येउन हजर झाल्यास, मी तर काय; पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वसाक्ष आदिनारायाणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाऱ्या ब्राम्हण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजिती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेकरून त्यांच्या तूनतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळीत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.
आपला खरेपणा पाहणारा
जोतीराव गोविंदराव फुले
तारीख १ ली, माहे ऑगस्ट,
सन १८७२ इसवी, पुणे,
जुनागंज, घर नंबर ५२७.
(क्षत्रियांचा आत्यंतिक द्वेष मनी बाळगून पृथ्वीवरून क्षत्रिय नामशेष करण्यास निघालेला दहशतवादी परशुराम व त्याचे उदात्तीकरण करणारे त्याचे वारसदार हेच खरे दहशतवादी आहेत,काय तर म्हणे परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली,तुमच्या पूर्वजांचा गळा घोटणारा परशुराम तुमचे दैवत असू शकते का❓)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत