मतदानाची टक्केवारी ११ दिवसांनी कशी बदलली? -इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार !
नवी दिल्ली:
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून संशय निर्माण झाला आहे.
मतदानाच्या दुसर्या दिवशी अंतिम आकडेवारी दिली असताना ११ दिवसांनंतर सुधारित आकडेवारी देण्यात आल्याने त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला असून हाच मुद्दा घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.
पहिल्या टप्प्यात
१९ एप्रिल २०२४ ला मतदान झाले
तर दुसर्या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ ला मतदान झाले.
या दोन्ही टप्प्यांत सरासरी ६० % टक्के मतदान झाले होते. या दोन्ही टप्प्यांची अंतिम आकडेवारी मतदानाच्या दुसर्या दिवशी देण्यात आली होती.
मात्र ३० एप्रिल २०२४ रोजी निवडणूक आयोगाने दोन्ही टप्प्यांत सरासरी ६६ % टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी दिली.
त्यात थेट ६ % टक्क्यांची तफावत होती.
त्यातही काही मतदारसंघांत तर हीच तफावत १० ते १२ % टक्क्यांपर्यंत आढळली.
त्याबाबत काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी तक्रार करून निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.
टक्केवारी वाढणे संशयास्पद
मतांची टक्केवारी वाढणे ही संशयास्पद बाब आहे.
मतदान झाल्यावर आकडा येण्यासाठी थोडा वेळ लागतो,
हे आम्हाला माहीत आहे.
एक-दीड टक्का मते इकडे तिकडे होऊ शकतात,
पण थेट दहा ते बारा टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होतो. त्यामुळे मतांच्या टक्केवारीचा हा घोटाळा आहे, त्याबाबत इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे,
अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत