
बौद्ध गया महाविहार व्यवस्थापन बौद्ध समूहा कडे देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ही याचिका घटनादत्त अनुच्छेद ३२ अंतर्गत ऐकण्यास आज ३० जून २०२५ रोजी नकार दिला आहे, “आम्ही याचिकेचा विचार करण्यास इच्छुक नाही, मात्र याचिकाकर्त्यास उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे.”असे सांगून त्यांनी न्यायालये ही काहीही ऐकून घेणार नाही असे म्हणणे ही न्यायव्यवस्थेची थट्टा असून न्यायालये निष्पक्ष नसून बटिक बनली आहे.हेच आजच्या निकालाने सिद्ध केले आहे.
मंदिर मशीद निवाडा करताना देवाचे प्रतिनिधी म्हणून बाजू ऐकली जाते.निवाडा केला जातो.येथे मात्र जागतिक पातळीवर तमाम बौद्ध धर्मीय ह्यांचे पवित्र महाविहार व्यवस्थापन याचिका ऐकून घेणार नाही असे म्हटले जाणे पूर्णतः असंवैधानिक आहे. लोकशाही मध्ये आपण सुप्रीम आहोत ते न्याय निवाडा करण्यासाठी ह्याचे भान न नसणे अथवा त्यांनी ते नाकारणे धोकादायक निर्णय आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत